शहीद भगतसिंग

आज दिनांक 15 ऑगस्ट 2021 गावातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने हजर राहिलेले अध्यक्ष महोदय व खाली बसलेले लहान लहान बालक माझ्या गावातील मित्र बांधवांना मी आज एक महान क्रांतिकारी नेत्यावर दोन शब्द सांगत आहे कृपया लक्ष देऊन ऐका भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांनी पैकी भगत सिंह हे एक होते भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी पंजाब मधील लाहोर जवळ बांगा या गावी झाला मित्रांनो भगतसिंगांच्या घरी संपूर्ण परिवार हा क्रांतीकारी चळवळीचे हिस्सा बनला होता म्हणून त्यांना पण या देशाचा मान ठेवणे आवश्यक होते भगतसिंग यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण लाहोरच्या दयानंद ॲग्लो वैदिक शाळेत झाली शाळा शिकत असताना त्यांच्या राष्ट्रवादी विचारांचे संस्कार झाले कारण त्यांच्या घरी त्यांचे वडील त्यांचे चुलत भाऊ अजित सिंह व सुवर्ण सिंह यांनी चळवळीत भाग घेतला होता.

 जरा विचार करा भगतसिंहांनी आपल्या वयाच्या बाराव्या वर्षी स्वतंत्र आंदोलनात भाग घेतला होता आज आपल्या घराचा मुलगा 12 वर्षांचा असेल तर त्याला आजीबरोबर बाहेरगावी सुद्धा पाठवणार नाही परंतु देशाबद्दल अफाट प्रेम असलेले भगतसिंग यांचे वडील किसन सिंह हे सुद्धा क्रांतिकारी युगपुरुष होते आपल्या कॉलेज जिवनात त्यांनी व मित्रांनी 1925 मध्ये नौजवान भारत सभेची स्थापना केली शेतकरी व कामगार यांचे राज्य स्थापन करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते म्हणून त्यांनी इन्कलाब जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अशा दोन घोषणा दिल्या मित्रांनो भगतसिंगांनी आपले कार्य सुरू ठेवले व दिल्ली कानपूर शहरातील क्रांतीकारकांशी संपर्क साधला व त्यांनी काकोरा कटाची योजना आखून सरकारी खजिना असलेली रेल्वे गाडी लुटली यात काही साथीदारांना फाशी झाली तेव्हा भगतसिंगांना काही दिवस भुमीगत लागले.

 गावकरी मित्रांनो ही काही साधी गोष्ट नाही पण आपल्या भारत मातेच्या रक्षणाकरिता त्यांचे फार मोठे मन होते काही दिवसांनी जतींद्रनाथ व भगतसिंग यांनी बॉम्ब बनवण्याचा कारखाना आग्र्यात सुरू केला व आपल्या क्रांतिकारी सहकाऱ्यांनी ते गरजेनुसार शस्त्र पुरवीत असत इंग्रजांच्या सभेत बॉम्ब फेकला त्यांच्या मालमत्तेची जबर नुकसान केले म्हणून इंग्रजांनी भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली तुरुंगात असताना त्यांनी आमरण उपोषण सुरू केले त्यात जतींद्रनाथ दास यांचा मृत्यू झाला तब्बल 80 दिवस त्यांनी अन्न खाल्ले नाही व शेवटी ब्रिटिश सरकारला माघार घेणे भाग पडले त्यांनी क्रांतिकारकांच्या मागण्या मान्य केल्या.


 काळे ब्रिटिश सरकारने 23 मार्च 1931 रोजी भगतसिंह सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा ठोठावली हे तीनही महान क्रांतिकारक हसत-हसत इन्कलाब जिंदाबाद च्या घोषणा फासावर चढले अशा महान क्रांतिकारकांची फोटो लावून पूजा करणे म्हणजे पुण्यच कमवीने होय.