गोधडी

आज आपण गोधडी या कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते हे बिंबवताना कवि म्हणतात गोधडी म्हणजे फक्त चिंध्या चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते. ती केवळ एक मामुली चादर नसते त्यात मायाममतेला ऊब देण्याची ताकत असते.प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते.

गोधडी च्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडी वरचे अस्तर हे वडिलांच्या फाटलेल्या धोतराच्या किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते गोधडीवर जणू आई-बाबाची माया लपेटलेली असते.

 गोधडीच्या आत आईने दामटवून दाटीवाटीने बसवलेल्या अनेक चिंध्या असतात त्या फक्त वरवर पाहता चिंद्या नसतात त्या मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला जुना जीर्ण झालेला सदरा असतो आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एक तुकडा पटपुर असते आणि पहिल्या मकर संक्रांतीच्या सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्या चे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात.बाबानी अंगात घातलेल्या नी जुन्या झालेल्या कोपरीच्या बाया असतात हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणीच्या सुईने गोधडीत ठेवलेला असतो शिवलेला असतो.

 म्हणून मी गोधडी म्हणजे केवळ चिंध्याचे बोचके नसते संसाराला हातभार लावलेल्या आई-वडिलांचे कष्ट घाम अश्रू श्वास रक्ताची ओढ आणि प्रेमळ जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडी सामावलेली असते अशा प्रकारे गोधडी हे आई-वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे.