महात्मा ज्योतिबा फुले
जन्म व बालपण
मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुन गावचे गोविंदराव फुले व सौ चिमणाबाई यांना ११ एप्रिल १८२७. रोजी पुणे येथे मुलगा झाला .ज्योतिबाचा नवस पावला म्हणून गोविंदरावांनी मुलाचे नाव जोतिबा ठेवले. जोतिबाना घरात जोतीच म्हणत. जे पुढे एक थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले या नावाने सुप्रसिद्ध झाले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे ज्योतिबा ची बुद्धी लहानपणापासूनच फार तल्लख होती त्यांची शिक्षणाची ओढ पाहून गोविंदरावांनी त्यांच्यासाठी विनायक जोशी या पंतोजी ची शिकवणी सुरू केली नंतर त्याचे नाव बुधवार पेठेतील इंग्रजी शाळेत घातले त्यावेळी पण उच्चवर्णीय शिवाय इतरांना शिक्षण घेऊ नये असा बडगा असल्यामुळे गोविंदरावांनी ज्योती चे नाव शाळेतून काढून घ्यावे अशा धमक्या त्यांना मिळू लागल्या मुलाचे काही बरेवाईट होऊ नये या भीतीपोटी गोविंदरावांनी ज्योतीला शाळेतून काढून घेतले.
शिक्षण
शाळेतून काढल्यामुळे ज्योतिबा आपल्या वडिलांना त्यांच्या धंद्यात मदत करू लागले पण त्यांचे मन रमेना दरम्यान नायगावच्या सुस्वरूप सुंदर सावित्रीबाईंची ज्योतिबाचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते त्यांची शिक्षणाबद्दलची विलक्षण ओढ एक दिवस लिजीट नावाच्या गोऱ्या मिशनरी साहेबांच्या लक्षात आली त्या साहेबांनी गोविंदराव यांची समजूत घातली आणि ज्योतिबाचा इंग्रजी शाळेचा प्रवास पुन्हा सुरू झाला यामुळे ज्योतीबांचा आनंद गगनात मावेनासा झाला या संधीचे ज्योतीबांनी सोने केले त्यांना धडा धडा इंग्रजी वाचता येऊ लागले आणि लिहिताही येऊ लागले.
अन्यायाविरुद्ध लढाई
पाश्चात्य संस्कृती तेथील व्यक्ती स्वातंत्र्य मानवी स्वातंत्र्य इत्यादीचा अभ्यास करण्यासाठी ज्योतीबांनी पाश्चात्त्य विचारवंत यांची पुस्तके शोधून वाचली त्यांचा सखोल अभ्यास केला उच नीच जातीभेद विटाळ चांडाळ याविरुद्ध त्यांना आता मोठा लढा घ्यायचा होता त्याची जय्यत तयारी ते करू लागले.
स्त्री शिक्षणाचा प्रसार
स्त्रियांनाही शिक्षित करण्याची गरज आहे हे ज्योतीबांच्या लक्षात आले व त्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचे रोपेटे लावले सावित्रीच्या मदतीने या रोपट्याचे पुढे महावृक्षात रूपांतर झाले.
अगदी मन लावून सावित्रीबाई शिकू लागल्या. त्यामुळे ज्योतिबानाही त्यांना शिकवण्यात रस वाटू लागला यथाअवकाश सावित्रीबाई चांगल्या शिक्षित झाल्या आणि या उभयतांनी शूद्रातिशूद्रांना साठी शाळा काढायचे ठरवले त्यातही स्त्रीयासाठीच पुण्यात पहिली शाळा काढायची असा त्यांचा मानस होता सर्व जाती-धर्माच्या मुलींना तेथे प्रवेश मिळणार होता कुठलेही चांगले कार्य करायचे म्हणजे समाज विघ्नआणणारच यामुळे समाजाकडून या शाळेला बराच विरोध झाला पण ज्योतिबा यांचा निर्धार पक्का होता पण शाळा सुरु करायची म्हणजे सर्वात पहिली आणि महत्वाची अडचण होती ती स्त्री शिक्षिकेची कारण काळ असा होता की मुलींना कोणी शाळेत पाठवितच नसत.आणि त्यातही पुरुषांकडून शिक्षण मिळणार असेल तर लोकांनी आपल्या मुलींना शाळेत पाठविलेच नसते त्यामुळे स्त्री शिक्षिका निवडणे गरजेचे होते.
समाजात प्राथमिक शिक्षण घेतलेली स्त्री मिळणे अवघड होते तेथे स्त्री शिक्षिका कोठून मिळणार पण ज्योतीबांच्या इच्छेनुसार सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षिका बनण्याची तयारी दाखवून ही अडचण चुटकीसरशी सोडवली सावित्रीबाई शिक्षित तर होत्याच पण शाळेत प्रत्यक्ष शिकवायचे कसे याचे विस्तृत शिक्षण सावित्रीबाईंनी ज्योतिबा चे मित्र केशवराव भवाळकर व नंतर मिसेस मिचेल या मिशनरी महिलेकडून घेतली आणि त्या उत्तम शिक्षिका बनल्या.
मुलींची पहिली शाळा
आता शाळा काढण्याचे स्वप्न पूर्ण होणार होते या शाळेसाठी ज्योतीबांच्या काही मित्रांनी त्यांना मोलाची मदत केली तात्यासाहेब भिडे यांनी आपल्या वाड्यातील एक खोली शाळेसाठी दिली त्यामुळे जागेचा प्रश्न सुटला तात्यासाहेबांनी प्रारंभिक खर्चासाठी १०१ रुपये देणगी ही दिली नंतर जोतिबांनी आपल्या मित्रांसह बऱ्याच लोकांच्या घरी जाऊन त्यांनी आपल्या मुलींना शाळेत पाठवावे यासाठी प्रयत्न केले.
१ जानेवारी १८४८ रोजी ज्योतीबांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून स्त्रियांसाठी शिक्षणाचा पर्यायाने त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करून एक महान सामाजिक कार्य केले.
अस्पृश्यांसाठी शाळा
शाळा सुरू झाली पण या शाळेत महार मांगी एकही मुलगी आली नाही याची ज्योतिबांना खूपच खंत वाटत होती कारण खरं तर ही चळवळ त्यांच्यासाठी महत्त्वाची होती म्हणून जोतिबांनी महार वाड्यातच मुला मुलींसाठी शाळा उघडण्याचा विचार केला १५ मे १८४८ रोजी उच्चवर्णीयांच्या कठोर विरोधाला तोंड देत ही शाळा सुरू केली जोतिबांनी स्वतः शाळेत शिक्षकाचे काम केले महार वाड्यातील शाळेतही लोक आपल्या मुलांना पाठवीत नव्हते त्यासाठीही जोतिबांनी स्वतः घरोघरी फिरून लोकांना शिक्षणाचे महत्त्व परोपरीने समजावून मोफत शिक्षण दिले जाईल अशी हमी देऊन मुलांना या शाळेत आणले यावरूनच त्यांची शूद्रातिशूद्रांना विषयीची तळमळ दिसून येते.
त्यांच्यासाठी केवठे महान कार्य होते हे जोतिबांचे.
शूद्रातिशूद्रांच्या कैवारी म्हणून लोक ज्योतिबा कडे बघू लागले ज्योतिबा ची कीर्ती सर्वदूर पसरू लागली अनेक इंग्रज अधिकारी आणि पुरोगामी विचारांचे ब्राह्मण सुद्धा जोतिबांची प्रशंसा करू लागले त्यांनाही आता शुद्रांवर झालेल्या अन्यायाची जाणीव होऊ लागली त्याचा पश्चाताप म्हणून हे सहृदयी ब्राह्मण शूद्रांच्या शाळेला मदत करू लागले.
सत्कार समारंभ
ज्योतिबाचा या महान कार्याचा गौरव करण्याचे सरकारने ठरविले १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यात सत्कार समारंभ आयोजित करून ज्योतिबांना शाल जोडी देऊन त्यांना गौरविण्यात आले सत्काराला उत्तर देताना ज्योतिबा म्हणाले हजारो वर्षापासून अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या शुद्रांसाठी व स्त्रियांसाठी शाळा उघडणे हे मी माझे कर्तव्य समजतो व त्याप्रमाणे. माझ्या कार्यात माझ्या पत्नीचा व माझ्या मित्रांचाही मोलाचा सहभाग आहे मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे मी सरकारला अशी विनंती करतो की समाजातील उपेक्षित वर्गांसाठी शिक्षणाचे महत्त्व जाणून सरकारने खेड्यापाड्यात जास्तीत जास्त शाळा उघडाव्यात ज्योतिबाचा सत्कार करून त्यांना शालजोडी दिल्यामुळे काही पुरातन वादी सनातनी चिडले शालजोडी ही फक्त ब्राम्हणांना दान द्यायची असते असे त्यांचे म्हणणे होते.
पुण्यातील शाळांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी आता बरीच मंडळी मदत करू लागली होती सावित्रीबाई सुद्धा रात्रंदिवस या कार्यासाठी झटत होत्या त्यामुळे ज्योतीबांनी आपला मोर्चा खेड्यापाड्यात कडे वळविला गावोगावी जाऊन त्यांनी लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटविले प्रत्येक गावात कार्यकारी मंडळ नेमायचे शाळेचा शुभारंभ करायचा आणि या मंडळावर शाळेचा कार्यभाग सोपवून आपण पुढील गावी जायचे असा कार्यक्रम ज्योतीबांनी सुरु केला.
पाहता पाहता पुणे आणि आसपासच्या खेड्यात जवळजवळ अठरा शाळा ज्योतीबांनी काढल्या आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली उच्चवर्णीयांच्या मते शुद्रानी शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणे ही पाप होते इतकं कठीण स्वप्न जोतिबांनी आपल्या खडतर प्रयत्नाने सत्यात उतरविले होते.
ज्योतीबांनी जरी शाळा स्वतः काढल्या असल्या तरी ते आणि सावित्रीबाई दोघेही शाळेमध्ये विनावेतन काम करीत होते आणि शाळेचा पैसा शाळेसाठी वापरायचा या तत्त्वाचे ते असल्यामुळे आता आर्थिक अडचणीचा प्रश्न येऊ लागला म्हणून मग ज्योतीबांनी मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली सावित्रीबाई फावल्या वेळात कपडे शिवणे रजया शिवने इत्यादी कामे करून संसाराला मोलाची मदत करू लागल्या.
अंधश्रद्धा निर्मूलन
समाजात अंधश्रद्धा बोकाळली होती गरीब अशिक्षित अडाणी समाज याला बळी पडला होता यातच भर म्हणून शेतात मोलमजुरी करणाऱ्या शेतमजुरांची खूप पिळवणूक होत होती हे सर्व पाहून त्यांच्यासाठी झटावे असे प्रकर्षाने ज्योतिबांना जाणवले या अडाणी लोकांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी रात्रीच्या शाळा काढण्याचा पर्याय शोधला कारण शिक्षणातूनच त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यात काही प्रमाणात यश मिळणार होते आश्चर्य म्हणजे ज्योतिबाचा हा प्रयत्न यशस्वी ही झाला बरेच लोक या रात्रीच्या शाळेत शिकण्यासाठी येऊ लागले.
हत्येचा प्रयत्न
काही धीट सनातन्यांनी मात्र एक प्रयत्न करून पाहिला दोन रामोशी यांना त्यांनी ज्योतिबांना मारण्यासाठी एका मध्यरात्री पाठविले जोतिबांना अचानक जाग आली बघतात तर हातात सुरे घेऊन रोडे नावाचा महार आणि धोंडीराम नावाचा कुंभार हे दोन रामोशी उभे होते निडरपणे ज्योतिबा त्यांना सामोरे गेले व म्हणाले माझे आयुष्य तुमच्यासारख्या दिन दुबळ्यांचा साठीच आहे.माझ्या मरणाने तुमचे काही भले होणार असेल तर मला खुशाल मारा मी मरणासाठी तयार आहे जोतिबांचे हे बोल ऐकून रामोशी खजील झाली त्यांनी ज्योतीबांच्या पायाशी लोळण घेऊन माफी मागितली जोतिबांनी त्यांना उदार मनाने माफ केले आणि नेहमी सोबत राहून शिक्षण घेण्यास सांगितले त्या प्रसंगावरून ज्योतिबाचा विशाल हृदयाची कल्पना येथे पुढे रोडे यांनी हट्टाने जोतिबांच्या शरीर रक्षकाचे काम केले तर धोंडीराम यांनी शिक्षणात रस घेऊन पंडित ही पदवी मिळवली या दोघांचा जणू वाल्याचा वाल्मिकी जोतिबांनी केला होता.
अस्पृश्य मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती या वाढत्या खर्चासाठी आर्थिक साह्य मिळावे म्हणून जोतिबांनी राज्यपालांकडे विनंती अर्ज पाठविले सरकारी अधिकाऱ्यांना अस्पृश्यांच्या शाळेत रस नसल्यामुळे खूप प्रयत्न करूनही मदत मिळाली नाही या शाळेसाठी दक्षिणा प्राइज कमिटी आणि इंग्रज अधिकारीच मदत करीत होते १८५७ च्या युद्धानंतर मात्र इंग्रजांची ही मदत बंद झाली.
बाल विधवा विवाह
आता त्यांनी आपले लक्ष समाजातील सर्वांत गहन अशा बालविधवांच्या समस्येकडे दिले होते पुरुष प्रधान संस्कृतीत त्याकाळी स्त्री विधवा झाली तर पुनर्विवाहाची सोय नव्हती पण बायको मेली तर पुरुष मात्र कितीही लग्न करू शकत होता शिवाय विधवांचे जीने म्हणजे अक्षरक्ष नरक यातना भोगल्या सारखे होते जोतिबांना हे पहावत नव्हते म्हणून यासाठी आपणच काहीतरी करावे ही भावना त्यांच्या मनात आली त्यावेळी बालविवाहाची प्रथा होती बालविधवा होत असत बाल विधवा विषयीची कळकळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
या कार्यासाठी ही त्यांना सनातन्यांचा कठोर विरोध पत्करावा लागला होता पण सहकार्य करायचे म्हणजे अडचणी ह्या येणारच ज्योतिबा कणखरपणे प्रत्येक विरोधाला तोंड देण्यास तयार असतात बालविधवांच्या उद्धाराचे विचार मनात घोळत असतानाच अचानक एक घटना घडली.
एकेदिवशी ज्योतिबा नदीकाठी फिरत असताना एक विधवा तरुणी आत्महत्येच्या प्रयत्नात त्यांना दिसली जोतिबांनी तिला वाचवले आणि मरणाचे कारण विचारले तेव्हा कळले की ती विधवा असल्यामुळे जवळच्या एका नातेवाईकाने तिचा गैरफायदा घेतला आणि ती गरोदर असल्याचे लक्षात येताच सारा दोष स्त्रीच्या माथी मारून तो मोकळा झाला होता तिच्या समोर मरणा शिवाय पर्याय नव्हता तेव्हा ज्योतीबांनी तिला स्वतःच्या घरी आश्रय दिला.
जोतिबांनी त्या विधवेला काशीला आपली मुलगी मानली. सावित्रीबाईंनी ही तिला आपुलकीने स्वीकारले तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जगण्यास तिला शिकविले अशाप्रकारे विधवांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सुरुवात झाली ज्योतिबा जो विचार करीत तो कृतीतही आणतात.
आश्रम स्थापना
नेहमीप्रमाणे सनातन्यांनी विरोधाचे स्तोम माजवले. शक्य होईल तितका विरोध दर्शविला शिव्याशाप देऊन मारण्याच्या धमक्याही दिल्या पण जोतिबांनी स्थितप्रज्ञ राहून आपले कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले त्यांनी या आश्रमात आलेल्या स्त्रियांना साक्षर बनविले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वेगवेगळ्या हस्तकलेचे शिक्षण दिले जेणेकरून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल.
समाजातील प्रत्येक बालविधवा किंवा निराधार महिलांना घरच्या लोकांच्या दडपणामुळे फायदा मिळू शकत नव्हता बालविवाह मुळे बाल विधवांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी काय करावे असा विचार ज्योतिबा करू लागली समाजातील प्रथामध्ये बदल करणे गरजेचे होते पुनर्विवाहाची सुरुवात व्हायला हवी हे जोतिबांनी हेरले जोतिबांनी अनेक सभा-संमेलने घेऊन या कायद्याचा झपाट्याने प्रसार केला ८ मार्च १८६० रोजी ते एका पुनर्विवाह ठरविण्यात यशस्वी झाली नंतर बर्याच सहकाऱ्यांनी या कामी मदत केली पुनर्विवाह पद्धतीमुळे बाल विधवांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती.
केशवपण बंदी
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे हेच जणू ज्योतीबांच्या जगण्याचे ध्येय होते स्त्रियांवरील कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार त्यांना सहन होत नव्हता आश्रमात येणाऱ्या विधवांचे केशवपन झालेले पाहून सावित्रीबाई हळहळत त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला आलेली विद्रुपता पाहून त्यांना फार दुःख होईल शिवाय या महिलांनाही आपल्याला केस नाहीत याचे वैषम्य वाटे.
सावित्रीबाईंनी स्त्रियांची ही व्यथा ज्योतिबा जवळ बोलून दाखविली आणि जोतिबांनी विधवांचे केशवपन ही अतिशय क्रूर प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न चालू केले येथेही उच्चवर्णीय आडवे येणारच होते दिवसेंदिवस जोतिबांची कीर्ती वाढतच होती त्यामुळे त्यांचा जळफळाट होत होता पण ज्योतीबांनी तर स्त्री सेवेचे व्रत घेतलेले असल्यामुळे ते त्या विरोधाला जुमानत नव्हते शेवटी विजय सत्याचाच होतो हे ज्योतिबा जाणून होते.
केशवपणावर वर बंदी आणण्यासाठी ज्योतीबांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले त्यांनी जनतेमध्ये जागृती करण्यापेक्षा केशवपन करणाऱ्या न्हाव्यानाच विश्वासात घेतले प्रत्येक न्हाव्याला भेटून तुम्ही विधवांचे केस कापण्याच नकार द्या असे सांगितले पण प्रश्न होता की दोन चार न्हावी या प्रथेवर बहिष्कार टाकून भागणार नव्हते त्यासाठी मग पूर्ण न्हावी समाजाची बैठक घेण्याचे ज्योतीबांनी ठरवले.
शंभर-सव्वाशे न्हावी सभेला हजर होते न्हाव्याना भावनात्मक रित्या स्त्रियांचे दुःख समजावून सांगण्यासाठी या विशाल सभेत स्वतः सावित्रीबाईनी बोलावे असे जोतिबांनी सुचविले सावित्रीबाईंनी सभेत सर्व न्हाव्याना बंधू म्हणून संबोधले आणि विधवा स्त्रियांचे दुःख त्यांच्यासमोर मांडले पती निधनाने आधीच अर्धमेली झालेली स्त्री त्यात सासरच्या लोकांचा जाच पांढऱ्या पायाची म्हणून समाजाची टीका हे सर्व तिला सहन करावे लागतेच आणि शिवाय या केशव पणामुळे विद्रुप चेहऱ्याने समाजात वावरणे तिला किती जड जाते हे सावित्रीबाईंनी सर्व न्हावी लोकांना समजावून सांगितले आणि पूर्ण न्हाव्याणीच या प्रथेवर बहिष्कार टाकला तरच ही कुप्रथा बंद होऊ शकते याची जाणीव करून दिली.
सावित्रीबाईंच्या बोलण्याच्या सर्व न्हावी यांच्या मनावर अनुकूल परिणाम झाला आणि त्या सभेतच सर्वांनी शपथ घेतली ही हाच पासून आम्ही कोणाही विधवेचे केस कापणार नाही सावित्रीबाईं सह ज्योतीबांनी यामुळे फारच आनंद झाला या नंतर मुंबईच्या समाजसेवकांनी अशीच एक सभा घेतली तेथेही त्यांनी सभेत बोलण्यासाठी सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना आग्रहाचे निमंत्रण दिले या सभेतही दोनशे-अडीचशे न्हाव्यांनी शपथ घेतली त्या प्रमाणेच बाकी ठिकाणच्या न्हाव्यांनी या प्रथेवर बहिष्कार टाकला.
उच्चवर्णीयांनी न्हाव्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या दडपणाला न घाबरता उलट न्हाव्यानीच काही काळ त्यांच्या हजामती करणे बंद केले आणि त्यामुळे उच्चवर्णीयांची पडती बाजू घ्यावी लागली अशा तऱ्हेने केशवपन प्रथा बंद झाली.
कामगारवर्गाला मदत
ज्योतिबा मजुरांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊ लागले त्यांना त्यांच्या व्यसनाचे दुष्परिणाम परोपरीने समजावून सांगितले त्यांच्या अशिक्षितपणामुळे कसे कारकून लोक त्यांच्या कामाचा त्यांना पूर्ण मोबदला देत नाहीत हे त्यांना समजावून सांगितले त्यांच्या अज्ञानामुळे व्यसनामुळे म्हणजेच पर्यायाने त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांच्यावर कसा अन्याय होत आहे याची जाणीव मजुरांना जोतिबांनी करून दिली भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठविणे सुरू केले पण अर्थात यामुळे त्यांना नंतर सरकारी कामे मिळणे बंद झाली अस्पृश्यांसाठी जलदान रणरणत्या उन्हात पाण्याची सोय व्हावी म्हणून पुण्यात पेशव्यांनी ठिकाणी पाण्याचे हौद बांधले होते पण अस्पृश्यांना या ठिकाणी पाण्याला हात लावण्याची बंदी होती तेथे पाणी भरणाऱ्या उच्चवर्णीयांनी जर त्यांच्या भांड्यात पाणी टाकले तरच त्यांना पाणी मिळेल अन्यथा रिकाम्या हाताने परत जावे लागेल ही बाब ज्योतीबांच्या लक्षात आली पाण्यावाचून तहानलेल्या जीवांकडे त्यांना बघवत नव्हते तात्काळ जोतिबांनी आपल्या घराचा हौद अस्पृश्यांसाठी मोकळा करून दिला प्रत्येकाला येथे पाणी भरण्याचे स्वातंत्र्य होते कोणत्याही वेळी हा हौद खुला असायचा.
बांधकामावरील मजुरांच्या समस्या प्रमाणेच जोतिबांनी शेतमजुरांच्या समस्या लाही हात घातला त्यासाठी त्यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले या पुस्तकात शेतमजुरांची कशी पिळवणूक केली जाते त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन कसे त्यांना अंधश्रद्धेच्या बळी ठरविला जातो याचे वर्णन होते या पुस्तकातून त्यांनी शेतमजुरांना शिक्षण देऊन स्वाभिमानी बनविण्याचे आव्हान केले होते.
सत्यशोधक समाजाची स्थापना
आजवर जोतिबांनी स्त्रियांच्या, समाजातील रसातळाला तील लोकांच्या उद्धारासाठी बरेच कार्य केले होते समाजातील बऱ्याच गहन प्रश्नांना हात घातला होता अगदी अशक्य असलेल्या गोष्टी ज्योतीबांनी शक्य करून दाखविल्या अनेक कुप्रथांचा त्यांनी बीमोड केला होता हे सर्व करतांना त्यांनी अक्षरक्ष काटेरी वाटेवरून चालावे लागले पण ते कधीही आपल्या ध्येयापासून मागे हटले नाही बहुजन समाजातील लोकांचा संघटितपणा पाहून ज्योतिबांना मनस्वी आनंद झाला लोकांचा स्वाभिमान जागृत झाला आहे हे सुवर्ण संधी साधून त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी आपल्या घरी एक मेळावा घेतला पुणे व आजूबाजूच्या परिसरातील पुरोगामी विचारांचे समर्थक बहुसंख्येने या मेळाव्यास उपस्थित होते.
या मेळाव्यात ज्योतीबांनी समाजातील उच्चनीचता जातीभेद आणखीन अशिक्षित अन्याय-अत्याचार पिळवणूक याबद्दल सविस्तर माहिती दिली विशेषतः त्यांनी जातीभेदावर भर दिला जात कोणी बनविली त्यात कुणाचा स्वार्थ होता ईश्वराने निर्मिलेल्या सर्व वस्तू सर्वांना वापरण्यासाठी मुभा असताना हा स्पृश्य-अस्पृश्य भेद कोठून आला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यामागचे सत्य शोधण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्याची घोषणा केली उपस्थितांनी एकमुखाने पाठिंबा दिला समाजाची स्थापना झाली.
या समाजाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शूद्रातिशूद्रांना ची पिळवणुकीतून मुक्तता करणे भटा ब्राह्मणांनी समाजाच्या मनावर घातलेला व्रत-वैकल्ये दानधर्म उपास-तापास आचा तगडा नष्ट करणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणे या समाजाचे अध्यक्ष होते अर्थातच ज्योतिबा त्यांनी प्रत्येक सभासदाला समाजाचे नियम समजावून सांगितले आणि प्रत्येक सभासदाला खालीलप्रमाणे प्रतिज्ञा घ्यावयास सांगितली.
१ सर्व मानवजात एकाच देवाची लेकरे आहेत पर्यायाने ते माझे बंधू भगिनी आहेत.
२ परमेश्वराची पूजाअर्चा आराधना धार्मिक कार्य मी स्वतः करीन त्यासाठी ब्राह्मण किंवा अन्य कोण्या व्यक्तीची मदत घेणार नाही.
३ मी आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करीन माझ्या घरात कोणीही निरक्षर राहणार नाही मी नेहमी राज निष्ठेने वागेन.
प्रत्येक सभासदाने बेलपत्र हाती घेऊन वरील नियमांचे पालन करीन व आजन्म सत्यशोधक समाजाचा अनुयायी बनून राहील ही शपथ घेतली.
गावोगावी सत्यशोधक समाजाच्या शाखा उघडण्याचे आवाहन जोतिबांनी केले लोकांनी ते कबूलही केले कुठल्याही जाती-धर्माच्या व्यक्तीला या समाजाचे सभासदत्व मिळू शकणार होते समाजाच्या कार्यकर्त्यांनी खेडोपाडी जाऊन धडाक्यात याचा प्रसार केला.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा चा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला यात मागासवर्गीयांच्या मुलांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली जोतिरावांच्या या अथक परिश्रमामुळे प्रतिष्ठित मंडळीही आता या समाजाचे सभासदत्व घेण्यास आतुरली होती.
इंग्रज सरकारने टिळक व आगरकर यांना अटक केली तेव्हा जामीन भरायला कोणी तयार नव्हते ज्योतिबा कडे एवढी रक्कम नव्हती पण त्यांनी उरवणे शेटजी कडून रकमेचा बंदोबस्त केला व टिळक आगरकर यांची सुटका करून घेतली.
सनातन्यांच्या पुढारी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ज्योतिबांना नेहमीच विरोध केला पण ज्योतीबांनी कधीही त्यांच्या बद्दल आपल्या मनात आकस ठेवला नाही विष्णुशास्त्री वेडसर झाले होते आणि या वेळातच त्यांनी आत्महत्या केली पण जोपर्यंत डॉक्टर नैसर्गिक मृत्यू असा दाखला देणार नाहीत तोपर्यंत अंत्यविधी करता येणार नाही असा पोलिसांचा अट्टाहास होता कोणी डॉक्टर दाखला द्यायला तयार नव्हते शेवटी त्यांच्या नातेवाईकांनी जोतिबांची मदत मागितली डॉक्टर विश्राम घोले हे ज्योतिबा यांचे जवळचे स्नेही होते शेवटी या डॉक्टरांनी तो दाखला दिला व विष्णुशास्त्री यांचा अंत्यविधी करता आला.
या लहान लहान उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की ज्योतिबा किती सहृदयी होते विरोधकांनाही ते मदतच करीत होते त्यांचे मन पवित्र निर्मळ व विशाल होते कोणाबद्दल ही त्यांच्या मनात शत्रुत्व किंवा विरोधाची भावना नव्हती.
हळूहळू प्रकृती साथ देत नाही असे पाहून ज्योतीबांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले काशी गेल्यामुळे तिच्या मुलाला यशवंताला ज्योतीबांनी आणि सावित्रीबाईंनी आपला मुलगाच मानले होते मृत्युपत्रात त्यांनी यशवंतलाच आपले वारसदार सांगितले होते तेव्हा यशवंता लहान होता म्हणून जोतिबांनी मृत्यू पत्रात लिहिले होते की यशवंता जर शिकून एक चांगला सद्गृहस्थ शूद्रांची सेवा करणारा त्यांच्यासाठी आपली आयुष्य वेचणारा लायक असा सज्जन पुरुष असला तरच त्याला माझी सर्व मालमत्ता द्यावी उनाड व्यसनी आणि टवाळक्या करणारा असला तर मात्र सर्व मालमत्ता सुधारणांमध्ये जो कोणी अतिशय हुशार कर्तबगार मुलगा असेल त्याला द्यावी व त्याच्याकडून सत्यशोधक समाजाचे कार्य आणि समाज सेवा करून घ्यावी.
मरणानंतरही सामाजिक कार्यात खंड पडू नये शूद्र अस्पृश्यांच्या उद्धारार्थ चे कार्य थांबू नये हे कार्य अव्याहतपणे चालू राहावी यासाठीच अशा प्रकारच्या मृत्युपत्राची तरतूद जोतिबांनी केली होती तेवढी ही दूरदृष्टी म्हणावी त्यांची.
एव्हाना यशवंता सोळा वर्षाचा झाला होता थाटामाटात सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने ज्योतीबांनी त्यांचे लग्न लावले यशवंता चे लग्न म्हणजे सत्यशोधक समाजाचा मोठा मेळावा होता ज्योतिबा आजारातून उठलेले होते त्यामुळे त्यांना भेटता येईल या दृष्टीने लग्नाला बरीच मंडळी आली होती जोतिबांनी ही जबाबदारी पूर्ण केली.
काही दिवसानंतर त्यांना दुसरा अर्धांगवायूचा झटका आला यावेळी मात्र त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही एक वर्षभर ते अथरुणाला खिळून होते आयुष्यभर दुसऱ्यांच्या समस्यांचा विचार करणाऱ्या ज्योतीबांच्या स्वतःच्या घरात आर्थिक चणचण भासू लागली यशवंता चे शिक्षण आणि ज्योतिबाचे आजारपण यात बराच पैसा लागला डॉक्टर विश्राम घोले यांनी मात्र एक पैसा न घेता आपली सेवा दिली तरीही घरातल्या परिस्थितीच्या कल्पनेने त्यांचे मन व्यथित झाले आपण सावित्री व यशवंता साठी काही करू शकलो नाही याची त्यांना खंत वाटत होती या विचारामुळेच ते खूप थकले आणि २७नोव्हेंबर १८९० रोजी रात्री दोन वाजता ज्योतीबांनी कायमचे डोळे मिटले.
0 टिप्पण्या