डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जन्म
डॉक्टर भीमराव आंबेडकर हे रामजी सपकाळ यांचे चिरंजीव होते.सपकाळचे नंतर आंबेडकर झाले सपकाळ घराणे पिढ्यानपिढ्या लष्करी सेवेत राहिले. बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव यांनी कंपनी सरकारच्या नोकरीमुळे रामजींना शिक्षण दिले . प्रथम वर्गापासून रामजी चा नंबर चांगल्या क्रमांकत राहिला. म्हणून शिक्षण सुरू असतानाच वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी लष्करी सेवेत घेतली गेले . एक वर्षानंतर एकोणिसाव्या वर्षी रामजी चे लग्न भिमाबाईशी झाले. रामजीना एकूण १४ अपत्ये झाली. बाबासाहेब रामजीचे चौदावे अपत्य होते. १४ एप्रिल १८९१ ही बाबासाहेबांची जन्मतारीख. पुढे योग पावन झाला व बाबासाहेब दलितांचे कैवारी ठरले.
बालपण
१८९४ साली रामजी पेन्शनवर आले. त्यावेळी पेन्शनरांना राहण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावी सरकारची वसाहत होती दोन वर्ष रामजी कुटुंबासह या वसाहतीत राहिले पण कटकटी भांडणे याचा भरपूर उत या वस्तीत असल्यामुळे त्यांनी नंतर नोकरीचा मार्ग पत्करला. सातारा येथे त्यांना पी डब्ल्यू डी ऑफिस मध्ये स्टोअरकीपर ची नोकरी मिळाली व ते १८९६ मध्ये कुटुंबासह साताऱ्याला आले. साताऱ्याला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात भिमाबाई वैकुंठवासी झाल्या. भिमराव यावेळेस फक्त पाच वर्षाचा होता रामजींनी नंतर जिजाबाई नावाच्या विधवेशी विवाह केला भीमरावाचे बालपण मात्र त्यांच्या जन्मताच पांगळ्या असलेल्या आत्या जवळ गेले मीराबाईंनी भीमरावाना आईच्या प्रेमाने वाढवले.
शिक्षण
अभ्यासात भीमरावची प्रगती प्राथमिक शिक्षणापासून उत्तम राहिली यातच त्यांचा तेजस्वी गौरवर्ण कुरुळे केस व बलदंड शरीर यामुळे सुरुवातीच्या कॅम्प स्कूलमधील आंबेडकर नावाच्या मास्तरांचे त्यांच्यावर खूप प्रेम जडले भिमरावा साठी ते दुपारचा जेवणाचा डब्बा आणत शाळेच्या रजिस्टरवर भीमरावाचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबवडेकर असे होते आंबेडकर गुरुजींना त्यांचे आडनाव बरेच लांबलचक व आडवळणी वाटले म्हणून त्यांनी त्यात सुधारणा करून आंबेडकर केले तेव्हापासून संगपाळचे आंबवडेकर व आंबेडकर झाले.
कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांची सुरुवातीची चार वर्षे मजेत गेली लष्करी शाळेत शिवाशिव प्रकार नव्हता त्यामुळे स्पृश्य-अस्पृश्य असे काही त्यांच्या दृष्टीस आले नाही. नंतर हायस्कूल मधील शिक्षणाकरिता ते सातारा हायस्कूल मध्ये गेले व तेथे त्यांना स्पृश्य-अस्पृश्य या शब्दांचा परिचय झाला १९०० च्या नोव्हेंबरमध्ये ते या शाळेत आले या शाळेत वेगळे बसणे दुसऱ्याने वरून पाणी टाकल्यावर ते पिणे असा भेद पाळला जायचा शाळेच्या सुटीत प्रवासामध्ये ही भीमरावाना अस्पृश्य वरीलं अन्यायाचे याचे दर्शन घडले. यावेळी भीमराव जरी वयाने लहान होते तरी त्यांच्या अंतकरणात स्पर्श कळला. शाळेच्या सुट्टीत ते वडिलांकडे घरी यायला निघाले.
यावेळी रामजी गोरेगावला नोकरीला होते भीमरावाचे पत्र रामजींना न मिळाल्यामुळे ते मुलांना घ्यायला स्टेशन वर आले नाही भिमराव आपल्या मोठ्या भावासोबत आनंदराव बरोबर स्टेशनवर वेटिंग रूम मध्ये वाट पाहत बसले स्टेशन मास्तरांनी त्यांची चौकशी केली पण जेव्हा त्यांना त्यांची जात कळली तेव्हा त्यांनी त्यांना वेटिंग रूम मध्ये बसू दिले नाही नंतर गोरेगाव पर्यंतच्या प्रवासात त्यांना जातीच्या प्रश्नामुळे मोठी रक्कम देऊन बैलगाडी भाड्याने घ्यावी लागली एवढ्यावरच जातीची आडकाठी थांबली नाही तर बैलगाडी त्यांना स्वतः चालावी लागली. गाडीवान पूर्ण रस्ता पायीचचालला.
इंग्रजी चौथ्या इयत्तेत जातीच्या अशाच आडकाठी मुळे भिमराव ला संस्कृत विषय घेता आला नाही कारण काय तर संस्कृत फक्त स्पृश्यांच्या हक्काचा यावेळी त्यांनी पर्शियन भाषेचा अभ्यास केला.
१९०४ या कालावधीत दुष्काळाची कामे संपली या नोकरीत असणाऱ्या नंतर सरकारने नोकर्या दिल्या नाहीत रामजींचे नोकरी ही यात गेली यावेळेपर्यंत सातारा हायस्कूलमध्ये भिमराव चा चौथा व आनंद नावाचा पाचवा वर्ग झाला होता नोकरी गेल्यामुळे रामजी पुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी कुटुंबासह सातारा सोडले व मुंबईला आले. एलफिस्टन हायस्कूलमध्ये भिमराव व आनंदराव आला प्रवेश दिला परळी येथील भाड्याच्या एका खोलीत रामजींनी गृहस्ती जुळवली.
लग्न
थोरले आनंदराव ची शिक्षणातील प्रगती जेमतेम होती यामुळे रामजींनी त्याला शाळेतून काढले घरची आर्थिक परिस्थिती अडचणीची असल्यामुळे त्यांना तसे करावे लागले खाजगी ठिकाणी त्याला कामाला लावून पाठोपाठ त्याचे लग्नही लावून दिले नंतर त्याच कालावधीत दापोलीच्या भिकोबा वलंकर यांच्या मुलीशी भिमरावाचा योग जुळला व लग्न करून दिले यावेळी भीमराव इंग्रजी पाचव्या वर्गात होते वधू रमाबाईचे वय अवघे नऊ वर्षाचे तर भीमराव १४ वर्षांचे होते भीमराव अभ्यासात हुशार असल्यामुळे वडील भाऊ बहिणी या सर्वांना तू खूप शिकावा असे वाटे याकरिता त्यांनी भीमरावला सर्व बाबतीत प्रोत्साहन व सहकार्य ही दिले भीमरावांनी मॅट्रिकच्या वेळी कसून अभ्यास केला व परीक्षा पास केली त्यावेळी अस्पृश्य जातीत मॅट्रिक परीक्षा पास होणारे भिमराव एकटेच ठरले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला.
केळुसकर यांचा परिचय व वचन
जानेवारी १९०८ मध्ये भीमराव यांचा सत्कार करण्यात आला.त्या वेळचे प्रख्यात इतिहास लेखक श्री कृष्णाजी केळुस्कर या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते भीमरावाचे कर्तुत्व पाहून आपल्या भाषणात त्यांनी त्यांची खूप स्तुती केली.
केळुस्करानी भीमरावला शिक्षणात वाटेल ती मदत द्यायचे वचन दिले भीमरावाचे मेट्रीक मधील यश व पुढे शिक्षणाची आवड पाहून केळूस्करणी मुंबई मुक्कामाला असलेल्या दान पुरुष सयाजीराव गायकवाड या बडोद्याच्या महाराजांची स्वतः जाऊन त्यांची भेट करून दिली भीमरावांची तन्मयता व प्रगती पाहून महाराजही खूप खुश झाले महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपयांची शिष्यवृत्ती देऊ केली.
प्रगतीचा मार्ग मोकळा झाला
महाराजांच्या मदतीचा हात देण्यामुळे भिमरावा च्या पुढील शिक्षणातील प्रगतीचा मार्ग मोकळा झाला पुढे शिक्षणात आपण खूप प्रगती करावी असा चंग बांधून भीमरावांनी कॉलेज शिक्षणात प्रवेश घेतला पर्शियन भाषेतील प्रभुत्वामुळे हायस्कूलमधील पर्शियन भाषेचे शिक्षक इराणी यांनी या कॉलेज शिक्षणाच्या वेळेस भीमरावना अभ्यासाकरिता आपल्या घरची वेगळी खोली दिली १११३ साली भीमराव बी ए ची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाले.
बडोद्याला मुख्य ऑफिस मध्ये भीमरावला चांगली ऑफिसर ची नोकरी मिळाली पण नशिबाचा योग नोकरी करण्याचा नव्हताच म्हणा ना एका आठवड्यातच त्यांना ही नोकरी मनाला न पटण्यासारखी झाली अस्पृश्य जातीमुळे उपहास दृष्टीने त्यांच्याशी वागणूक व्हायची भीमराव मोठे साहेब पण साधा कारकूनही कागदपत्रांच्या फाईल त्यांच्या टेबलवर दुरून फेकायचा सहानुभूती अंशालाही मिळत नव्हती भीमरावाचे अशांत मन पूर्णपणे खचून गेले पण दैवाचा योग वेगळा असल्यामुळे मार्ग सुरळीत व मोकळा होत गेला.
मुंबईहून वडील खूप आजारी असल्याची तार आली भीमराव ताबडतोब मुंबईला आले पण रामजींनी भिमराव आला डोळे भरून पाहून कायमचा निरोप घेतला २ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजी जीवनज्योत मालवली भिमरावा करिता वडील कायमचे संपण्याचे दुःख खूप मोठे होते आदर्श वडिलांची मूर्ती त्यांच्या मनात विचारात हवीहवीशी असल्यामुळे जणू डोळ्यासमोर स्थिरावली वडील आपल्या करिता खूप खपले हे भीमरावला विसरणे अशक्य होते पण जीवनात आपण खूप मोठे व्हावे नावलौकिकाला यावे अशी वडिलांची इच्छा त्यांच्या जाणिवेला असल्यामुळे त्यात बेतात त्यांनी दुखाला आवरले.
दुसऱ्या दिवशी बडोद्याच्या ऑफिसमधील स्थिती महाराजांच्या काणावर घालण्याकरिता ते मलबार हिलवरील राजवाड्यात महाराजांना भेटण्यास गेले पण दैवाने तिथे चमत्कार घडवला महाराजांच्या विचारात असलेल्या हिंदुस्थानातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता परदेशी पाठवण्याच्या यादीमध्ये भीमरावला आपले नाव पाहायला मिळाले जून १९१३ मध्ये घरची व्यवस्था लावून भीमरावांनी हिंदुस्तानचा निरोप घेतला.
एम.ए व पीएच.डी
त्यावेळी उच्च शिक्षणाकरिता परदेशी जाणारे अस्पृश्य जातीतील आंबेडकर हे पहिलेच होते हिंदुस्तान पासून न्यूयार्क पर्यंतचा प्रवास भीमरावांनी बोटीने केला २०जुलैला ते न्यूयार्क शहरी पोचले. सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठ सत्रात त्यांना प्रवेश मिळाला यावेळी एम ए पीएच डी आपल्या अभ्यासक्रमा करिता त्यांनी समाजशास्त्र व अर्थशास्त्र हे दोन विषय निवडले दोन्ही विषयांच्या प्राध्यापकांवर भीमरावांनी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेची छाप पाडून त्यांची मने जिंकली याचा चांगलाच उपयोग झाला भिमराव दृढनिश्चयी व परिश्रमी असल्यामुळे अभ्यास करण्याची वेळ त्यांनी सतत अठरा तासापर्यंत पोचवली निवडलेल्या विषयावरील निरनिराळ्या लेखकांचे ग्रंथ त्यांनी मन लावून वाचली त्या त्या ग्रंथावरील टीका प्रति टीकाही त्यांनी सोडल्या नाहीत भाषाविषयक अगोदर बीए असल्यामुळे भीमरावांना प्रथम निवडलेल्या विषयात जुळवायला थोडा त्रास झाला पण त्यांनी प्रयत्न करून त्यातूनही मार्ग काढला.
१९१५ सालीभीमरावांनी एम ए ची परीक्षा पास केली या पाठोपाठ त्यांनी पीएचडी करिता नॅशनल डीवीडेंड ऑफइंडिया.'ए हिस्टॉरिकल अंड अनेलीटीकल या नावाचा प्रबंध लिहिला व पदवी मिळवली याशिवाय हिंदुस्थानातील जाती त्यांची घटना उत्पत्ती व वाढ यावर सविस्तर निबंध लिहिला व तो विद्यार्थी मंडळापुढे वाचला या निबंधा मधील इतिहास त्यातील ज्ञानाचा सखोल दृष्टिकोन पाहून अमेरिकन पंडित सुद्धा आश्चर्यचकित झाली.
बॅरिस्टर व्हायची इच्छा
परदेशी येण्याचा भिमरावाचा हेतू साध्य झाला पीएचडी या दोन्ही पदव्या त्यांनी सन्मानाने मिळविल्या आता शिष्यवृत्तीची एक वर्षाची मुदत शिल्लक राहिली अभ्यासाच्या व्यासंगामुळे त्यांना स्वस्थ बसवत नव्हते बॅरिस्टर व्हायची टोचणी त्यांच्या मनाला लागली आणि त्यांनी बॅरिस्टर व्हायचा निर्णय घेतला बडोद्याच्या सयाजीराव महाराजांना पत्राद्वारे आपली इच्छा कळवली व त्यांच्याकडून आर्थिक मदतीची व्यवस्था बाबासाहेबांनी करून घेतली त्यासाठी न्यूयॉर्कहून इंग्लंडला दाखल झाले लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत ऑक्टोंबर १९१६ मध्ये प्रवेश घेतला एम एस सी च्या या प्रवेशा सोबतच भीमरावांना बॅरिस्टर करिता ही प्रवेश मिळाला त्यांना खूप आनंद झाला मोठ्या यशस्वी ने या दोन्ही परीक्षा पास व्हायचा बेत ठरला पण भीमराव लंडन येथील या परीक्षा देऊ शकले नाही बडोद्याला परत यायचे. बोलावणे पत्र त्यांना आले शिष्यवृत्ती बंद करण्याचा व नोकरीवर हजर राहायचा मजकूर वाचून बाबासाहेबांना अतिशय दुःख झाले पण उपाय नव्हता त्यांना शेवटी करावेच लागले लंडन युनिव्हर्सिटी ने मात्र त्यांची बुद्धीमत्ता व शिक्षणातील प्रगती पाहून त्यांना धीर दिला व हाच अभ्यासक्रम चार वर्षानंतर पूर्ण करता येण्याची हमी दिली हिंदुस्थानात परत आल्यानंतर बडोद्याला डॉक्टर आंबेडकरांना नोकरी मिळाली एका पारशी हॉटेलमध्ये त्यांनी आपली राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
आईच्या मृत्यूनंतर बाबासाहेब बडोद्याला परत गेले नाही मुंबईतच काही शिकवण्या व कायद्याचा सल्ला वगैरे व्यवसाय प्रपंच याकरिता करायचा त्यांनी विचार केला व ते त्या प्रयत्नाला लागले शेवटी परिणाम योग्यच जुळला व त्यांना सिडनहॅम कॉलेजमध्ये ४५४रुपये पगारावर अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली.
समाजकार्याचा श्रीगणेशा
एम ए व पीएच डी च्या पदव्या प्राप्त करण्याकरिता बाबासाहेबांनी हिंदू संस्कृतीची रचनाही सूक्ष्मपणे चाळली यामध्ये त्यांना जातीयतेमुळे फांद्या फुटलेला हिंदू समाज दिसला मनुस्मृतीमध्ये त्यांच्या पुरोहित वर्गाच्या बहुजन समाजावर असलेला कायदेशीर पिळवणुकीचा कट दृष्टीस पडला. जाणत्या वयापासून दृष्टीस पडलेली अस्पृश्यता व तिच्यावर होणारे अत्याचार यामुळे सहाजिकच बाबासाहेबांचा कल तिकडे वळला चिमटा बसनार्यालाच चिमट्याने झालेल्या वेदना कळतात .असे बाबासाहेबांशी झाले.
बाबासाहेबांनी अस्पृश्यता करिता लढलेल्या व लढत असलेल्या पुढाऱ्यांचा मागोवा तपासला तर त्याच्या मुळाला हात घातलेले त्यांना कोणी दिसले नाही असेच पुढेही सुरू राहिले तर कधीही अस्पृश्य हीत पूर्णपणे साध्य करता येणार नाही. याची बाबासाहेबांना इतिहासाने व काल प्रवाहाने खात्री झाली. त्यातूनच वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी १९१८ मध्ये त्यांनी साऊथ ब्युरो कमिटीपुढे अस्पृश्याच्या हक्काची मागणी केली. अस्पृश्यांच्या स्वतंत्रपणे निवडून येण्याचे अधिकार द्यावेत तसेच स्पृश्य हिंदू चे त्यांच्यावर कसलेही बंधन नसावे अशा आशयाचा लेखी अहवाल त्यांनी यावेळी साऊथ ब्युरो कमिटीपुढे मांडला त्याचवर्षी नागपूरला परिषद भरली ही संधी त्यांनी सोडली नाही या परिषदेत त्यांनी हजेरी लावली.
शाहू महाराजांचे प्रोत्साहन
अस्पृश्य समाज अज्ञानी होता त्यांच्यात शिक्षण प्रसार व जागृती होणे अत्यावश्यक आहे ही जाणीव पूर्णपणे दृष्टीस दिसण्यामुळे व विचाराला पडल्यामुळे ३१ जानेवारी १९२० पासून बाबासाहेबांनी मूकनायक नावाचे नियतकालिक सुरु केले व अस्पृश्य समाजात जागृती चा पाया खोदला अस्पृश्य समाजावर होणारे अत्याचार व अन्याय त्यांनी साध्या सरळ पण प्रभावी विद्वत्तेने उत्पन्न असलेल्या भाषेत या नियतकालिकात उघड केले त्यांनी मूकनायक मधील हे अभ्यासपूर्वक लिहिलेले लेख पाहून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना सक्रीय प्रोत्साहन दिले व २१ मार्च १९२० रोजी कोल्हापूर येथील माणगावला भरलेल्या अस्पृश्य परिषदेत त्यांचे अभिनंदन करून पाठ थोपटली.
बॅरिस्टर पदवी प्राप्त
एम एससी बारअट लॉ बॅरिस्टर व डी एस्सी या पदव्या मिळविण्याकरिता ५ जुलै १९२० रोजी बाबासाहेब इंग्लंडला गेले कॉलेजच्या नोकरीत होईल तेवढी जास्तीत जास्त बचत त्यांनी केली पण जमलेली रक्कम इंग्लंड वास्तव्यातील खर्चाकरिता कमी होती यावर उपाय म्हणून त्यांनी मित्रांकडून काही रक्कम मिळवली छत्रपती शाहू महाराजांना त्यांची अडचण कळताच त्यांच्यातील प्रतिभेच्या ओळखीमुळे आर्थिक साह्य केले.
जून १९२१ मध्ये एम एस सी करीत Povincial decentralisation of imperial finance in british india हा निबंध सादर केला व पदवी मिळवली त्यानंतर डीएससी ही पदवी बाबासाहेबांना मिळवायची होती दीड वर्ष पुन्हा त्यांनी दिवस-रात्र एक करून आपल्यातील विद्वत्तेचा एव्हरेस्ट परिचय दिला ऑक्टोंबर 1922 मध्ये बीएस्सी पदवी करिता प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा निबंध लिहिला.
लंडन यूनिवर्सिटी मधील परीक्षा समितीचे सदस्य तर बाबासाहेबांच्या निबंधातील सखोल व संशोधनात्मक अभ्यास दृष्टीला पाहून चकित झाले या निबंधात बाबासाहेबांनी सरकारी यंत्रणेच्या नियम पद्धतीवर टीकेचा खूप भडीमार केला असल्यामुळे निबंधात बरसा फेरबदल पुन्हा करून घ्यावा लागला हा फेरबदल नंतर बाबासाहेबांनी हिंदुस्थानात परत येऊन केला निबंध पुन्हा लिहायला वेळ लागणार होता व तो अधिक वेळ लंडन वास्तव्यातील खर्चाचा बोजा पोचण्याच्या आर्थिक स्थितीला पुरेसा नव्हता १४ एप्रिल १९२३ रोजी ते मायदेशी परतले या पदव्या बाबासाहेबांनी नंतर हिंदुस्थान मध्ये अभ्यास करून सन्मानपूर्वक मिळवल्या.
पदव्या प्राप्त झाल्या पण प्रपंचाचा प्रश्न होता त्याच स्थितीत राहिला विद्वत्तेचा अधिक भर पडल्यामुळे त्यानुसार त्यांना नोकरी हवी होती पण अस्पृश्य शब्दामुळे अडवणूक झाली सिडनहॅम कॉलेजचे रिक्त असलेल्या प्राचार्यांच्या सन्माननीय पदाऐवजी व पूर्वीचे प्राध्यापकाचे पद समोर केले शिक्षित वर्ग ही त्या वेळी एवढ्या प्रमाणात जातीला विचारात घ्यायचा या भेदनीति चा बाबासाहेबांचा मनावर खूप परिणाम झाला संताप आटोक्यात ठेवता आला नाही त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली यापुढे कधीच नोकरी करायची नाही नोकरी न करण्याचा निश्चय करून बाबासाहेबांनी मुंबई हायकोर्टात वकिली करण्याचा प्रयत्न चालवला वकिली सुरू करण्याकरिता फी भरायची होती पण पैसा जवळ नव्हता तेव्हा मित्राकडून पैशाची जुळवाजुळव करून त्यांनी फी भरून वकिलीला सुरुवात केली .
येथेही जात आडवी आली आणि ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्याकडे सुरुवातीला कोणी आले नाही पण बाबासाहेबांनी वांनी भीम प्रकाराचा निश्चय केला. प्रयत्न जिद्द विद्वत्ता व कामातील तळमळ या गुणांना त्यांनी अतिशय धार दिली. हळूहळू वकिलीवर पकड मिळवली व नावलौकिक असलेल्या रस्टरच्या सूचीमध्ये आपले नाव उभे केले.
विधिमंडळात नेमणूक
आर्थिक प्रश्न खूप चांगल्या प्रकारे सुटला नावलौकिक मिळाला तसेच पैशाचा जणू पाऊस पडला तरी पण बाबासाहेब अंतर्मनाने अशांत होते जात शब्द त्यांच्या डोळ्यात सतत टोचणी द्यायचा त्यावेळी तुर्कस्तानची खलिफाची गादी इंग्रजांनी संपविण्याची घोषणा केल्यामुळे मुसलमानांनी याकरिता खिलाफत चळवळ सुरू केली या चळवळीला अखिल भारतीय काँग्रेसने पाठिंबा दिला न्याय मिळाला पण हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रश्न लक्षात घेतला तर अस्पृश्यांचा प्रश्न उभा होतो पण काँग्रेस सुसंस्कृत होती यापुढे पाठीराखा ही सुसंस्कृत असावा असे त्यांचे विचार होते.
१९२४ च्या मार्चमध्ये मुंबईच्या दामोदर हॉलमध्ये अस्पृश्यांची सभा भरवली अस्पृश्यता अस्पृश्यांची हित व लढायचा लढा याची सोप्या पण प्रभावी भाषेत त्यांनी सभेला माहिती दिली याचबरोबर अस्पृश्य शिक्षण वाढीवर त्यांनी भर दिला त्याची सुरुवात म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा निर्माण केली अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार करणे शिकणाऱ्या करिता वस्तीगृह बांधणे व त्यांची राहणी व वागणूक सुधारणे सांस्कृतिक केंद्रे अभ्यास मंडळे स्थापन करणे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणे याकरिता धंदे शिक्षण व शेतकी शाळा स्थापन करणे इत्यादी कामे सभेने करायचे ठरवले पुढे या सभेने लवकरच सोलापुरातील बार्शी येथे मुंबई प्रांतिक अस्पृश्य परिषद घेतली ४ जानेवारी १९२५ रोजी बार्शीला एक वस्तीग्रह उघडले. त्यानंतर बाबासाहेबांच्या कार्याला प्रोत्साहन मिळत गेले त्यांनी अस्पृश्यता निवारणाच्या आपल्या कार्याला जागृती स्वरूपाने खूप गतिमान केले.
निपाणी पासून जागृती कार्याला सुरुवात करून ते संपूर्ण मराठीत देश फिरले निपाणीचा सभेत बाबासाहेबांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीचा अज्ञानावर खूप चांगला परिणाम झाला अशी सभा त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण गावची जिंकली त्यांच्या आजोळचा भाग असल्यामुळे आपल्या भागातून निर्माण झालेल्या विद्वान पंडित आला पाहण्याकरिता स्वाभाविकच गर्दी झाली या भागातील लोक इतर भागापेक्षा जागृत व्यक्तिमत्त्वाचे पण बाबासाहेबांच्या उद् बोधक भाषणाचा व अस्पृश्यांविषयीच्या तळमळीचा त्यांच्यावर मोठा पकड घेणारा परिणाम झाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट त्यांना प्रस्थानाची व सहकार्याची स्पष्टता केली त्यानंतर गोव्यातील सभा त्यांनी अशाच प्रतिसादानेजिंकली.
महाडचा सत्याग्रह
१९२६मध्ये सरकारने अस्पृश्यांच्या सवलतीचा कायदा पास केला पण प्रत्यक्षात तो अमलात आणण्याचे धाडस झाले नव्हते व हाच प्रयोग करण्याचे बाबासाहेबांनी ठरवले 19 व 20 मार्च 1927 या दोन दिवशी प्रांतिक अस्पृश्य परिषद घेऊन प्रयोग करण्याचे ठरले परिषदेच्या दिवशी महाडला दूरदूरचे अस्पृश्य गोळा झाले जणू पंढरीचा चा मेळा भरला.
चार दिवसांच्या शिदोरी सोबत घेऊन काही जण पायी प्रवास करत उत्साहाने आले 19 मार्च ची सभा उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमली प्रभावी भाषणाचा उपस्थितावर खूप चांगला परिणाम झाला बाबासाहेब शब्दाचा जयनाथ आकाशाला स्पर्शला हजारो डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर आले.
दुसऱ्या दिवशी 20 मार्चला महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्यायचा बेत ठरवला गेला असल्यामुळे विरोधी गट तयारीने उपस्थित झाला पण बाबासाहेबांनी निश्चय डगमगू दिला नाही व अस्पृश्यांची नेतृत्व केले महाडच्या चवदार तळ्याचे पाणी सर्व उपस्थित अस्पृश्यांना पिऊन अस्पृश्यावरील अन्यायाला वाचा फोडली नारळ फोडला व एक्याची स्पष्टता केली खंबीर नेतृत्वामुळे आज पर्यंत अश्रू ढाळत असता आलेल्या अस्पृश्यांनी कंबर कसली व हक्का करिता चळवळीला ताठ कण्याने उभे केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची सुरुवात
बाबासाहेबांच्या अस्पृश्य चळवळीला खूप विरोध होऊ लागला अस्पृश्य दंड थोपटून आखाड्यात उतरले त्यामुळे स्पृश्यांची झोप उडाली पुण्याच्या मांगवाड्यात त्यांनी मांग चांभार ढोर व इतर असलेल्या अस्पृश्य जाती बांधवांची मोठी सभा घेतली व त्यांना स्पृस्श्यांचा कावा उघड करून दाखवला यावर्षी विधिमंडळात असल्यामुळे बाबासाहेबांनी असेम्बली गाजवली अस्पृश्यांना सरकारी खात्यात जागा मिळणे लोकल बोर्डाच्या शाळेत शिक्षक म्हणून व विद्यापीठात प्रतिनिधी म्हणून घेण्यात यावी या मागण्या उचलून धरल्या.
कार्य सुसाट वेगाने धावत होते तोच बाबासाहेबावर यावर्षी दोन मोठे आघात झाले प्रथम त्यांचा राजरत्न नावाचा आवडता मुलगा मरण पावला व तेवढ्यातच मोठे बंधू आनंदरावजी गेले पहाडा एवढे दुःख बाबासाहेबांवर कोसळले पण अल्पावधीतच ते त्यांनी पचवले दिन दुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य त्यांच्या समोर उभे होते त्यामुळे त्यांना आपले दुःख आवरावे लागले.
अस्पृश्य हक्का करिता चालवलेल्या या जागृतीमुळे शैक्षणिक प्रगती व्हायला लागली व त्यातील अडचणी सरकारी दरबारी येऊ लागल्याने सरकारने याकरिता एक कमिशन नेमले बाबासाहेबांचा समावेश या कमिशनमध्ये करण्यात आला या कमिशन कार्याच्या दौऱ्यामुळे ही ठिकाणची अस्पृश्य विद्यार्थ्यांची स्थिती बाबासाहेबांना खूप जवळून पाहता आली विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करता यावी ही मुख्य बाब त्यांना आढळल्यामुळे यावर उपाय म्हणून 1928 आली पीपल्स एज्युकेशन सोसायटी या त्यांनी स्थापन केली व सोसायटी द्वारे दोन वस्तीगृह उघडली सरकारकडूनही पाच वस्तीगृह उघडण्या करिता त्यांना कबुली मिळाली.
पहिल्या गोलमेज परिषदेचे निमंत्रण
पहिले महायुद्ध संपल्यानंतर कबुली प्रमाणे ब्रिटिश सरकारने भारताला 1919 मध्ये काही राजकीय सुधारणा दिल्या पण त्यांना देण्यासारख्या होत्या या सुधारणांच्या हिंदुस्थानचा राजकीय जीवनावर काय परिणाम झाला हे पडताळनीकरिता सायमन यांच्या नेतृत्वात फक्त इंग्रजांचा समावेश असणारी एक कमिशन ३ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतात आले या सायमन कमिशनला काँग्रेसने काळ्या झेंड्या दाखवल्या एक सर्वपक्षीय सभा घेतली पण भारतात काँग्रेसच्या विरोधामुळे सायमन कमिशनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे सायमन कमिशन परत गेली व ब्रिटीश पार्लमेंट समोर आपला जो रिपोर्ट सादर केला त्यात काँग्रेस बद्दल बरेच ताशेरे ओढले यामुळे हिंदुस्थानच्या भवितव्याच्या वाटाघाटी करिता 10 ऑक्टोंबर 1930 रोजी लंडन येथे ब्रिटीश पार्लमेंटने पहिली गोलमेज परिषद भरवली या परिषदेमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले अस्पृश्य वर्गातर्फे बाबासाहेब यांची नेमणूक करण्यात आली गोलमेज परिषदेचे करिता ब्रिटिश पंतप्रधानाच्या निमंत्रणावरून चार ऑक्टोबरला बाबासाहेब लंडनला पोहोचले परिषदेपूर्वी त्यांनी परिषदेला आलेल्या इतर पक्षप्रमुखांच्या भेटी घेतल्या व आपला हेतू सविस्तर स्पष्ट केला परीक्षेमध्ये बाबासाहेबांनी व अस्पृश्यांच्या हाताचे व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे विद्वत्तापूर्ण शब्दात विश्लेषण केले उपस्थित मंडळी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाली त्यांनी यावेळी उपस्थित पक्षप्रमुख व ब्रिटीश पार्लमेंट अशी अधिक सविस्तर चर्चा करून अस्पृश्य हिताबद्दल पूर्ण सहकार्याची कबुली दिली लंडनच्या प्रमुख वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या विचारांची दखल घेऊन त्यांच्या भाषणात प्रसिद्धी दिली या परिषदेमुळे अस्पृश्यांवर अन्याय जगाच्या दृष्टीस पडला व चळवळीचे महत्त्व लोकांना पटू लागले.
नेतृत्वाला पाठिंबा
सप्टेंबर १९३१ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने दुसरी गोलमेज परिषद भरवली यात बाबासाहेबांना फेडरल स्ट्रक्चर कमिटी व अल्पसंख्याक समितीवर निवडले परिषदेमध्ये गांधीजींनी स्वातंत्र्याच्या प्रश्नावर भाषण केली पण आंबेडकरांनी त्याला जबरदस्त तोड दिली असून त्याकरिता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्यांनी उचलली गांधीजींनी पुन्हा बाबासाहेबांशी चर्चा केली व नंतरही तीन महिने परिषदेत वाटाघाटीचे प्रयत्न झाले पण परिणाम एक पाऊलही पुढे गेला नाही बाबासाहेब परिषदे होऊन भारतात परतल्यावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले 1932 मध्ये अस्पृश्य जनमताचा कौल पाहण्याकरिता बाबासाहेबांनी बिहार कलकत्ता व मद्रास इत्यादी ठिकाणी दौरा केला 6 मे 1932 रोजी कामठी ला भरलेल्या अधिवेशनातही बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात आला या अवधीत त्यांनी ब्रिटिश पंतप्रधानांची भेट घेऊन अस्पृश्य हिताच्या बाजूने निर्णय लावून घेतला.
गांधीजी आणि आंबेडकर
पहिली गोलमेज परिषद काँग्रेस शिवाय आटोपली या परिषदेत आंबेडकरांनी मांडलेल्या अस्पृश्यांच्या स्थितीचा विस्तारपूर्वक आढावा परिणामकारक झाला दुसऱ्या परिषदेला जाण्यापूर्वी गांधीजींनी बाबासाहेबांशी चर्चा केली पण आंबेडकरांचे समाधान झाले नाही त्यांच्या मनात अस्पृश्य उद्धाराची तळमळ होती त्यांना अस्पृश्य वर्ग हीन दर्जाच्या चाकरीतून व गुलामगिरीतून सुटलेला हवा होता.
बाबासाहेबांनी हे स्वतः अनुभवले होते त्यामुळे कोणी महार शब्द उच्चारला की त्यांच्या रक्तात उसळी भरायची आयुष्यभर ते अस्पृश्यांसाठी झटले शेवटपर्यंत कधीही गांधीजी व आंबेडकर यांचे विचार जुळले नाहीत.
पुणे करारावर सही
शिक्षणामुळे हिंदुस्थानात शिक्षित वर्ग निर्माण झाला शिक्षित वर्गाला इंग्रजांच्या अन्यायाची जाणीव होऊ लागली त्यातूनच स्वातंत्र्याचे वारे वाहायला लागले पण हिंदुस्थानात हिंदू मुसलमान व अस्पर्श या मुख्य जातीमध्ये आपसी मतभेद व्हायला लागली म्हणून अगोदर स्वातंत्र्य व नंतर प्रश्नांची सोडवणूक असे गांधीजींचे म्हणणे होते परंतु हजारो वर्षापासून चाकरी करत असलेल्या अस्पृश्य वर्गाच्या हिताबद्दल स्वातंत्र्यप्राप्ती अगोदर समाधान झाले नाही तर स्वातंत्र्यानंतरही ते कधीच होऊ शकणार नाही हे बाबासाहेबांनी दूरदृष्टीने पडताळणी स्पृश्याच्या हाती सत्ता आल्यानंतर त्यांना सेवा करणारा वर्ग लागणार होता व तो अस्पृश्या शिवाय दुसरा कोणी होऊ शकत नव्हता शेवटी 14 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटीश पंतप्रधानांनी जातवार मतदारसंघ हिंदुस्तान कडे पाठविले गांधीजींना मात्र यातील अस्पृश्य मतदारसंघ वेगळा नको होता याकरिता त्यांनी येरवड्याच्या तुरुंगात उपोषण केले गांधीचा प्राण स्पृश्यासाठी अनमोल असल्यामुळे सर्व चिंताक्रांत झाली त्यांनी बाबासाहेबांशी वाटाघाटी केल्या त्यांची मनधरणी केली व बाबासाहेबांना काही अटीवर माघार घ्यावी लागली पण गांधीजींनी हट्ट सोडला नाही वेगळा मतदारसंघ न ठेवता काही जागा राखून ठेवण्याचा करार पुणे येथे करण्यात आला यावर सर्व पुढाऱ्यांनी व बाबासाहेबांनी सह्या केल्या हाच तो पुणे करार पुणे करारावर सह्या करताना बाबासाहेबांना प्राणांतिक वेदना झाल्या 27 मे 1935 रोजी बाबासाहेबांना आणखीन आघात देणारी घटना घडली ती म्हणजे त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांना कायमचे सोडून गेल्या हे दुःख पचवून त्यांनी अस्पष्ट हिताचे चळवळ सुरूच ठेवली.
धर्मांतराची घोषणा
खूप प्रयत्न करूनही अस्पृश्य हित साध्य होत नव्हते धर्मांतरा शिवाय उपाय नाही हे ठरवून येवले या गावी मोठी परिषद भरवून बाबासाहेबांनी धर्मांतराचे आपले म्हणणे मांडले सर्वांनीच सहकार्य करण्याचे ठरविले धर्मांतराच्या घोषणेची नंतर ख्रिस्ती व इतर धर्मियांनी त्यांना आपल्या धर्मात येण्याबद्दल विनंती केली पण इतिहास वाचनामुळे बाबासाहेबांना बौद्ध धर्म मानव कल्याणाकरिता पूर्णपणे समर्थ आहे हे दिसले स्वयंप्रकाशित व्हा ही गौतम बुद्धांची शिकवण असल्यामुळे बाबासाहेबांनी हाच धर्म स्वीकारण्याचे ठरविले.
१९३६ मध्ये अस्पृश्य हिताच्या दृष्टीने दोन महत्वाच्या घटना घडल्या म्हैसूर प्रांतात तिथल्या महाराजांनी दसरा महोत्सवाच्या वेळी अस्पृश्यांना उत्साहात भाग घेण्याची मोकळीक दिली दुसरे म्हणजे त्रावणकोर संस्थानात मुख्य प्रधानमंत्री असलेल्या स.र रामस्वामी अय्यर यांनी संस्थानातील सर्व देवळे अस्पृश्यांना दर्शनासाठी खुली करून दिली.
घटना समितीवर निवड
सप्टेंबर 1946 मध्ये काँग्रेसने हंगामी सरकार स्थापन केले मुस्लिम लीगने या सरकारवर बहिष्कार टाकला इतर सर्व पक्षांनी मात्र एक मुखी सहकार्य दिले घटना लोकशाही सार्वभौम सरकार याविषयी विस्तारपूर्वक व विद्वत्तापूर्ण स्पष्टता यावेळी बाबासाहेबांनी घटना परिषदेच्या बैठकीत केली घटना परिषदेच्या बैठकीत यांची निवड घटना तयार करण्याच्या समितीत केली गेली भारताला मार्ग दाखवणारी घटना बाबासाहेबांनी लिहिली व भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले 15 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने शेवटी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा कायदा पास केला एका महिन्यानंतर 15 ऑगस्ट ला भारताला खाऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले पंडित नेहरूंनी बाबासाहेबांना सन्मानाने कायदामंत्री निवडले.
धर्मांतर
हिंदू समाजातील भेद अन्याय व विषमता या विषयी सविस्तर स्पष्टता करणारे हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी तयार केले पण ते पास झाले नाही त्यामुळे सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आपले पूर्ण लक्ष धर्मांतरावर केंद्रित केले महाबोधी सोसायटी तर्फे घेण्यात आलेल्या बुद्ध जयंती सोहळ्यात बौद्ध धर्मावर त्यांनी आपले विचार प्रकट केले यानंतर कोलंबोत भरलेल्या बुद्ध मेळाव्यात त्यांनी व्याख्याने दिली मद्रास त्रिवेंद्रम् मुंबई वरळी आदी अनेक ठिकाणी त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला जून 1952 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना डॉक्टरेट ऑफ लॉज ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
८ मे १९५५ रोजी धर्मांतराच्या शेवटच्या निर्णयाची सभा मुंबईच्या नरे पार्कवर त्यांनी भरवली या सभेत धर्माची आवश्यकता व बौद्ध धर्म याविषयी खूप सविस्तरपणे बाबासाहेब बोलले आणि भाषणाचा क्रांतिकारी परिणाम झाला 18 महिन्याच्या काळात धर्मांतराची पूर्ण तयारी करण्यात आली 14 ऑक्टोबर 1956 हा दसऱ्याच्या दिवस धर्मांतरण करिता मंगलमय ठरला धर्मांतर सोहळा नागपूरला झाला बाबासाहेब यांची पत्नी व सुमारे पाच लाख अस्पृश्यांनी दिक्षा घेऊन बौध्द धर्म स्वीकारला ब्रह्म देशातून आलेले चंद्रमणी त्यांच्या सहकाऱ्यांशी दीक्षा घेणार या सर्वांना दीक्षा दिली सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहीरपणे अस्पृश्य यांचा धर्मांतर सोहळा बाबासाहेबांनी घडवून आणला.
महापरिनिर्वाण
अस्पृश्यांना बाबासाहेबांनी धर्मांतराची पायरी देऊन ताठ कण्याने उभे केले जणू याच कार्यासाठी पृथ्वीतलावर त्यांचा जन्म झाला होता धर्मांतरानंतर अवघ्या दोनच महिन्यांनी म्हणजे सहा डिसेंबरला त्यांची इहलोकाची यात्रा संपली बाबासाहेबांच्या मृत्यूच्या बातमीने अस्पृश्य वर्गाला हादरा बसला अस्पृश्य उद्धाराकरिता ज्याने आपले आयुष्य वेचले तो प्रकाश दाखविणारा ज्ञानदिवा कायमचा मालवला.
0 टिप्पण्या