डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माझे वर्गमित्र आणि बाहेर गावातील पाहुणे व पालक वर्ग वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजर झालेले सभापती साहेब ग्रामपंचायत सरपंच साहेब माझ्या शाळेतील शिक्षक वर्ग व खाली बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनींना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर थोडक्यात भाषण देत आहे कृपया आपण लक्षपुर्वक ऐकावे.

तर मित्रांनो त्या काळात धडपणे एक वेळचं खायला अन्न मिळत नव्हते अशा वेळेला सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये 14 वे रत्न म्हणून 14 एप्रिल 1891 ला मध्य प्रदेशच्या महू या गावात भीमराव जन्माला आले.

 मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते.बाबासाहेबांचा जन्म 14 तारखेला होणे वंशामध्ये चौदावे पुत्र वडिलांना होणे ही एक मोठी आश्चर्य व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले होते तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी पोरं दूरदूर बसायचे कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते. अगोदर महार या जातीला शूद्र समजले जात होते. त्यांच्या अंगाला  हात लागला तर लोक पुन्हा अंघोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले व शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा त्यांनी शाळेच्या खिडकीजवळ मास्तर काय शिकवते हे बघून अभ्यास केला त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आमच्या घरी रामायण ग्रंथ आहे महाभारत आहे तुम्ही ते वाचत राहाता मग हे लोक विटाळ का मानतात. रामजींना प्रश्न पडला की पोराला कसे समजावे आता उशीर झाला होता. मित्रांनो एवढा मोठा अपमान सहन केला पुढे ते 1907 मध्ये मॅट्रिक पास झाले.भीमराव तरून झाले हे लक्षात येताच त्यांच्या वडिलांनी रमाबाई नावाच्या मुली सोबत यांचा विवाह 1908 मध्ये करून दिला. रमाबाई या गरीब घरातल्या होत्या त्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्या शिक्षणात मदत केली रमाबाईंनी सोन्या-चांदीची कधी आशा केली नाही कपाळाचं कुंकू हेच ती आपला दागिना समजत असे. वकील बनून गरिबांना न्याय मिळवून दिला समाजाच्या कल्याणाकरिता त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही शूद्रांना महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे मनाई होती परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून सर्वांकरता ते खुले केले भारतीय न्यायव्यवस्था अर्थव्यवस्था सुरळीत चालावी म्हणून त्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन राज्यघटना भारतीय संविधानाची निर्मिती केली. त्यांचे आम्हा सर्व समाज बांधवांवर  फार ऋण आहेत.

मित्रांनो बाबासाहेबांनी अशी प्रतिज्ञा केली की जरी हिंदू धर्मात जन्म घेतला तरी पण मी हिंदू धर्मात मरणार नाही म्हणून त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती व इसवी सन 1956 च्या 14 ऑक्टोबरला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली.

 मित्रांनो या देशातील समता स्वतंत्रता एकता टिकून राहावी म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाह 15 एप्रिल 1948 रोजी डॉक्टर सविता कबीर या ब्राह्मण मुलीशी केला बाबासाहेबांच्या जीवनावर असे अनेक प्रसंग आहेत की आपण दिवस-रात्र बोललो तरी संपणार नाहीत काही दिवसात त्यांच्या प्रकृती बिघडली व दिल्लीमध्ये सहा डिसेंबर 1956 साली बाबासाहेब आम्हाला कायमचे सोडून गेले. 

 त्यांचे पार्थिव शरीर विमानाने मुंबईचा दादर चौपाटीवर आणण्यात आले.व अंतिम संस्कार बुद्ध रितीरिवाजानुसार करण्यात आले.तेव्हापासून त्या भूमीला चैत्यभूमी असे नाव देण्यात आले. मित्रांनो ह्या महामानवाच्या अंत्ययात्रा मध्ये दहा ते बारा लाख नागरिक शामील झाले होते व त्यांची रांग लांबच लांब म्हणजे तीन मैलाची होती.असे इतिहासात नमूद आहे हे.तर आता मी जास्त न बोलता आपले भाषण संपवतो.