सावित्रीबाई फुले

आज दिनांक 3 जानेवारी 2021 दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण आमच्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतो.

 माझ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्रांनो मी आज तुमचा बराच वेळ घेणार नाही कारण बरेच विद्यार्थी सावित्रीबाई च्या जीवनावर बोलणार आहेत तर मी काही त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग सांगत आहे कृपया लक्षपुर्वक ऐकावे आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना मुलींना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नव्हती शाळेत मुलींना कोणीही पाठवत नव्हते .अशा काळात या महान आईने एका गरीब घरी म्हणजे 3 जानेवारी 1831 ला जन्म घेतला. त्यांच्या काळात बरेच लोक मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू समजायचे चूल आणि मूल हेच मुलीच आयुष्य होत. परंतु महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सण 1840 ला लग्न केले त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या 9 वर्षांच्या होत्या सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवले त्या गणित शिकल्या लिहायला-वाचायला शिकल्या मित्रांनो जेव्हा ज्योतिबा सावित्रीला धडे शिकवीत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणे मारायचे त्यांची थट्टा करायची पण त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती त्यांनी. आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही गुण शिकल्या व सुशिक्षितही झाल्या .

विद्यार्थी मित्रांनो ज्योतीबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला पुणे मध्ये सन 1848 ला मुलींची पहिली शाळा उघडली त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड झाली.

 मित्रांनो त्या काळी लोक अडाणी अज्ञानी होते जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर  शेन दगड मारून फेकायचे बरेचदा बाईंचे कपडे खराब व्हायचे परंतु मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाही कारण मान अपमान त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली व शिक्षण सुरू ठेवले मित्रांनो आज जर कोणी व्यक्ती शिक्षकावर दगड मारलं तर काय होणार याची जाणीव तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणुन सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली 1864 ला त्यांनी अनाथ बालकाश्रम सुरू केले त्यांच्या या कार्यक्रमाचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरिता केले त्याचे ऋण कधीही भारतीय स्त्री फेडू शकणार नाही आज प्रत्येक मुलीने किंवा बाईने सावित्रीबाईंचा फोटो लावून दररोज अगरबत्ती लावून पूजा केली तरी कमीच आहे पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1890 च्या साथीने ज्योतिबा दगावले  व सात वर्षानंतर दहा मार्च 1997 ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व संसार सोडिले सर्व घरदार एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

 जय हिंद जय भारत