संतवाणी 

पहिला अभंग - संत बहिणाबाई


 लिंबाच्या झाडाला कडूपणा कोण देतो आणि  ऊसाला गोड कोण करतो.

 बीज कडू असेल तर फळ कडू येते व बीज गोड असेल तर आपोआपच फळ गोड असते हा चवीचा न्याय कोण निर्माण करत असेल हा स्पष्ट अर्थ लक्षात घ्या.

 इंद्रवण नावाच्या वनस्पतीच्या मुळात विष कोण घालते आंब्याला अमृताची मधुरता कोण देते.

 बचनाग वनस्पतीच्या अंगात विष कोण भिनले फुलाला सुगंध बाहेरून आणावा लागत नाही त्याच्या गाभ्यातच सुगंध असतो.

 मोहरीला तिखटपणा कोण देतो खारकेत गोडवा कोण निर्माण करतो.

 संत बहिणाबाई म्हणतात नेहमी जसे बीज असते तसे फळ मिळते म्हणून उत्तम काय आणि वाईट काय याची परीक्षा करावी.

 दुसरा अभंग - संत निर्मळा

 संत निर्मळा म्हणतात रात्रंदिवस माझे मन सतत  तळमळत आहे माझ्या जीवाला खूपच हळहळ वाटते मला खूप चिंता लागली आहे.

 माझी पावले आता मला दिसत नाहीत कारन संसाराच्या या जंजाळात मी गळ्यापर्यंत बुडाली आहे.

 या प्रपंचाचा मला खूप वीट आला आहे हे देवा मला बसलेला हा संसाराचा पाश तोडून टाक.

 संत निर्मळा म्हणतात हे देवा आता मला संसारापासून परकेपणा येऊ दे चोखामेळा ची शपथ मी तुम्हाला घालते आहे.

 तिसरा अभंग - फादर थॉमस स्टीफन्स

 फादर स्टीफन्स मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात जसे तेजामध्ये रत्नाचे तेच उत्तम असते आणि रत्नांमध्ये निळा हिरा जसा उत्कृष्ट असतो त्याप्रमाणे सर्व भाषांमध्ये उत्तम भाषा मराठी आहे.

 जसे फुलांमध्ये मोगऱ्याचे फूल सुंदर असते किंवा सुगंधा मध्ये कस्तुरीचा सुगंध  सगळ्यात छान असतो तसेच सर्व भाषांमध्ये मराठी सुंदर आहे.

 जसा पक्षांमध्ये मोर देखणा आहे झाडांमध्ये कल्पतरु सर्वात फलदायी आहे तसा सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा मान थोर आहे.

 सर्व तारकांमध्ये जशा बारा राशींच्या तारका महत्त्वाच्या आहेत सात वारं मध्ये सूर्याचा वार रविवार व चंद्राचा वार सोमवार हे दोन वार महत्त्वाचे आहेत त्याप्रमाणे द् वीकल्पामध्ये सर्व भाषांमध्ये मराठीबोली सर्वोत्तम आहे.