अन्नजाल
निसर्गातील जीवसृष्टीच्या अन्नसाखळी विषयी अत्यंत मूल्यवान संदेश देतांना कवी म्हणतात एक कडी दुसऱ्या कडीत गोवून कडीला कडी जुळूउन माणूस साखळी बनवतो साखळीची निर्मिती कडी ला कडी जोडून होते या साखळीत मधली कडी जर सुटली किंवा तोडली तर संपूर्ण गुंफलेली माळ विस्कटून जाते तुटून जाते.
धागा धागा जोडून कोळी हा कीटक कसे जाळे विणतो ते पहा एका धाग्याला अनेक धागे जोडलेले असतात त्या अनेक तंतूंना अनेक तंतू जोडलेले असतात परंतु त्या संपूर्ण जाळ्यामध्ये अनेक धागे जरी तुटले तरी ते जाळी न बिघडता अखंड राहते
प्राणी सृष्टीचा नियम असा आहे की एका प्राण्याला दुसरा प्राणी खातो दुसऱ्या प्राण्याला तिसरा प्राणी खातो अशा त्याच्या अन्नसाखळीमध्ये जर दुसर्या प्राण्याची जमात सगळी मेली तर सगळी अखंड साखळी नष्ट होऊन जाते निसर्ग देव या अन्नसाखळीचे व मध्येच होण्याचे रहस्य जाणतो त्याने दिव्य दृष्टीने सर्व पाहिले आणि जरी अनेक प्राणी जाती नष्ट झाल्या तरी अन्नसाखळीचे महाजाल टिकून राहील अक्षय राहील असे अन्नजाल निसर्ग नारायणाने निर्माण केले.
निसर्ग देवाने निर्माण केले हे अन्नसाखळीचे महाजाल आतापर्यंत जरी टिकून राहिली असला तरी ते कमकुवत होत आहे हे जाणून घ्या हे मानवा तू जर अनेक पाणी जातींना नष्ट केल्या त्यांना जिवानिशी मारून टाकले तर हे अन्नजाल भविष्यात तुटून जाईल व संपून जाईल.
0 टिप्पण्या