होळी 2022 १८ मार्च शुक्रवार
मित्रांनो होळी म्हटलं की आपल्या सर्वांचा आवडता सण आणि खास करून लहान मुलांसाठी हा सण तर खूपच आवडीचा आहे होळीच्या दिवशी आपण होळीका पेटवतो. लाकूड तसेच शेणाच्या गव-या यापासून आपण होळी तयार करतो संध्याकाळी होळी तयार केली की आपण तिला पेटवतो. होळी पेटवून घेण्याच्या अगोदर तिची विधिवत पूजा केली जाते. होळीला नैवेद्य दाखविला जातो त्यानंतर होईल पेटवली जाते. ग्रामीण भागामध्ये तर होळी पेटविण्याचा दिवशी मुले बोंबा मारतात. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तसेच होळीला सुद्धा पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी म्हणजेच धुलीवंदन हा सण असतो. या दिवशी लहान मुले व मोठी माणसे एकमेकांना रंग लावतात. लहान मुले रंगीत पाणी पिचकारी मध्ये भरून एकमेकांच्या अंगावर उडवतात.
रंगपंचमीच्या दिवशी घ्यावयाची काळजी
१) रंगपंचमीच्या दिवशी नवीन कपडे घालू नये.
२) रंग खेळण्याच्या अगोदर संपूर्ण त्वचेला व केसांना तेल लावून घ्यावे. यामुळे आंघोळीच्या वेळी रंग त्वचेला घट्ट चिटकून राहणार नाही व लवकर निघून जाईल.
३) रंगपंचमी हा सण साजरा करत असताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा. केमिकल युक्त रंगांचा वापर करू नये.
४) आजारी असल्यास रंगपंचमीचा सण साजरा करू नये.
५) रंगपंचमी चा सण साजरा करत असताना कोरड्या रंगांचा वापर करावा.
भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो.
0 टिप्पण्या