1 मे महाराष्ट्र दिन भाषण 

नमस्कार विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गेली कित्येक वर्षे जगाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, विकासाच्या धडपडित स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आपला महाराष्ट्र


आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापनादिन.


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. आपला महाराष्ट्र दगडांचा ,मातीचा, डोंगराचा ,विचारांचा, कलावंतांचा, बुद्धीवंतांचा, शास्त्र ज्ञांनांचा ,समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे


महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.


महाराष्ट्र दिन मराठी माणसे मोठ्या उत्साहात साजरा करतात.


महाराष्ट्र ही संतांच्या, ऋषीमुनींच्या, वीर पुरुषांच्या ,पवित्र विचारांनी पावन झालेली भूमी आहे.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच मातीत जन्मले आणि लहानाचे मोठे झाले.


शिवाजी महाराजांनी जगाला सर्व धर्म  समभावाची, विश्व बंधुत्वाची शिकवण दिली त्यांच्या विचारांवर आजही महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा आहे.


आपल्या


देशासाठी प्राण पणास लावणारी अनेक शूर रत्ने महाराष्ट्रात चमकली देशासाठी प्राणांची आहुती दिली


मराठी मातीत जन्म झाल्याचा महाराष्ट्रीय असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे आजच्या महाराष्ट्राला शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवूया शेवटी एवढे म्हणेल छत्रपती शिवाजी महाराज की जय ,


जय हिंद ,


जय महाराष्ट्र