आज जवळपास कोरोना विषाणू मुळे जगातील अनेक क्षेत्राचे काम अनिश्चित काळासाठी ठप्प झाले आहे. याला शाळा ही अपवाद नाहीत जवळपास एक वर्षापासून  शाळा बंद आहेत आणि अध्यापन ऑंनलाईन सुरु आहे आणि पुढेही शाळा केंव्हा सुरु होतील याबद्दल अनिश्चितता आहे. अशा वेळी सर्व पालकांसमोर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.या सर्व समस्येवर पुढील प्रमाणे काही उपाय देखील आहेत.

1) शाळेद्वारे दिले जाणारे ऑंनलाईन शिक्षण - 

जवळपास सर्वच शाळेद्वारे विद्यार्थ्यांनाऑंनलाईन  शिक्षण दिले जात आहे पण यातही अनेक  समस्या आहेत . सर्व विद्यार्थ्यांनाकडे मोबाईल नसने.मोबाईल असला तरी ग्रामीण भागांमध्ये रेन्ज नसणे रिचार्ज करण्यासाठी पैसे नसणेअश्याही समस्या आहेत.तसेच अन्यही समस्या आहेत . यावर आपल्याकडे काही प्रमाणात  उपाय देखील आहेत.शाळेच्या ऑंनलाईन तासिके नंतर विद्यार्थ्यांना काही समस्या असल्यास त्या समस्या शिक्षकांना फोनद्वारे विचारता येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल उपलब्ध नाही असे विद्यार्थी संख्यने कमी असल्यामुळे शाळेत  येऊन देखील शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊ शकतात 

२) शिक्षण विभागाकडून दिले जाणारे शिक्षण - 

शिक्षण विभागाकडून देखील ऑंनलाईन शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.त्यातील विशेष म्हणजे वाटसअप च्या माध्यमातून सुरु असलेली स्वाध्यायमाला.दिक्षाअप तसेच इतरही अनेक उपक्रम देखील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शक ठरत आहे.

३) बाजारात उपलब्ध झालेल्या विविध apps - 

कोरोना काळात ऑंनलाईन शिक्षण देणाऱ्या विविध apps बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत ex byjus,vedantu,top scorer .यामध्ये काही apps  महागड्या आहेत तर काही स्वस्त देखील आहेत.topscorer  सारख्या चांगल्या apps स्वस्तात देखील उपलब्ध आहेत.या सर्वांची देखील शिक्षणाच्या कामात मदत होत आहे

4) तंत्रस्नेहि शिक्षकांची मदत -

कोरोना काळात तंत्रस्नेही शिक्षकांनी बनवलेले lessonsvideo,questions paper, याची देखील खूप मदत झालेली आहे.अशा शिक्षकामुळे शैक्षणिक दर्जा टिकवण्यास मदत झाली आहे .

४) इतर - 

psschool,BOLO, यासारखे उपक्रम देखील खूप फायदेशीर ठरलेले आहेत.

अशा प्रकारे कोरोना विषाणूमुळे शाळा बंद असूनही शिक्षण सुरु आहे.लेख लिहण्याच्या मागचा हेतू म्हणजे या सर्व बाबी विद्यार्थी व पालका पर्यंत पोहचायला हव्यात.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील या सर्व साधनाचा उपयोग करावा.

                                                                                                              आपला 

                                                                                                         सुभाष भडांगे 

                                                                                                        मुख्याध्यापक 

                                                                                                जि.प .प्रा.शाळा.लोधेवाडी

                                                                                            केंद्र खामगाव ता.बदनापूर.जि.जालना