आता उजाडेल
आता सूर्य उगवेल उदास आंधळा काळोख सगळा आता संपून जाईल सूर्य किरणांची कलाबूत सोनेरी जर लहरत लहरत बहरेल आता उजाडेल.
आनंदाच्या शुभ्र लाटा आता गात गात फुटतील पक्षांच्या कोमल गळ्यातून किलबिलाट सुरू होईल पानापानात वारा हसेल मुक्तपणे आपल्या हिरवेपणात गढून जाईल गहिवर दाटून आलेल्या प्रकाशात दव मिसळेल आता उजाडेल.
पारिजातकाचे झाड आनंदात आपल्या फुलांचा उधळून वर्षाव करील पहाटेचा गोड कोवळा गारवा फुलांच्या सुगंधाने थरथरेल आता सूर्य उगवेल
कार्यांमध्ये देवदूत आपोआप फुलतील नीळा सोनेरी प्रकाश दिशादिशातुन उमलून येईल आता उजाडेल.
सूर्याच्या किरणांची दाहीदिशा उजळून निळे आकाश प्रकाशाने भरून जाईल प्रकाशाचे जणू महान दान चराचराच्या कणाकणात स्फुरण पावेल आता सूर्य उगवेल सूर्याच्या आगमनाने सारी भीती आज सरुन जाईन मनामध्ये प्रकाशमान झरे वाहतील असा पहाटेचा मंगलमय आशीर्वाद प्राणांतून उगवेल आता उजाडेल.
0 टिप्पण्या