15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व येथे जमलेल्या पालक वर्ग व शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी आज तुमच्या समोर 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञानी अशिक्षित होता.  .

 यामुळे इंग्रज भारतात आले हळूहळू व्यापार करू लागले व देशावर आपला हक्क करून घेतला इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे  शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पीक त्यांना द्यावे लागे. अनेक प्रकारचा कच्चामाल खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माळ तयार करून आम्हाला ते विकायचे या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांना त्याकाळी जन्म घेतले तसे भगतसिंग राजगुरू सुभाष चंद्र बोस महात्मा गांधी इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरुष यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

 आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेऊन मोर्चे काढत होते त्या मोर्चात इंग्रजांना मदत करणारे लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत असे लोक भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झाले. मित्रांनो एकदा अमृत्सर जालियनवाला बाग मधील सभा सुरु असताना इंग्रजाचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरिकांना गोळीबाराचे आदेश देऊन मध्ये ठार केली असे अनेक प्रसंग आहेत की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. दिवसावर दिवस उलटत गेली व इंग्रजांना हाकलून लावण्याचा आपल्या भारतीयांच्या लक्षात आले . इंग्रजांना शेवटी लक्षात आले . की आता भारतीय लोक जागृत झाले आहेत त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे म्हणून इंग्रजांनी आपली सर्व व्यवस्था इंग्लंडला घेऊन गेले व पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन करून आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र म्हणून घोषित केले .

 तो दिवस भारतीयांना मोठा आनंदाचा होता दुःखाचे दिवस सुखात आणि प्रत्येक भारतीयांना वाटले होते. आज या  प्रसंगी प्रत्येक कोर्ट कचेरी शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये आपल्या भारत देशात स्वतंत्र दिवस म्हणून तिरंगा झेंडा फडकविण्यात येतो ध्वजारोहण करून थोर पुरुषांना श्रद्धांजली वाहतो त्यांचे कार्य व गुण गातो स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व काय प्रत्येक भारतीयांना भाषणाच्या मार्फत राहते मित्रांनो आज आपला भारत देश फार शक्तिशाली राष्ट्र बनला आहे कोणत्याही देशाने जर डोळा वाकडा केला तर त्याला डोळा बाहेर काढायला एक मिनिट लागणार नाही ते निश्चितच .तर आज मी तिरंगी झेंड्याला व त्या महान हुतात्म्याना  त्यांना खरी श्रद्धांजली वाहतो व माझे भाषण संपले असे जाहीर करतो.

 बोला भारत माता की जय जय हिंद जय भारत