गे मायभू
मातृभूमीचे गौरव गीत गाताना कवि म्हणतात हे मातृभूमि मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी आभाळातील सूर्य चंद्र व सारे तारे पृथ्वी वर आणीण हे भारत देशा तुझी तेजोआरती मी गाईन.
हे मातृभूमि तू माझी माऊली आहेस तुझ्या अंगावर खेळणारे अजूनही मी तान्हे लेकरू आहे माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पान्हा हळूच सोड तुझ्या मायेच्या दुधाने माझे शब्द माखू देत.
हे माता तुझ्यापुढे मी माझी वेदना मांडणार नाही तुझ्यामुळे जर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले.
मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो तुझी जराशी पायधुळ जेव्हा मी माथ्यावर लावतो तेव्हा माझे नशीब जणू काशीचे पवित्र प्रयाग क्षेत्र होते माझी भाग्यरेषा पावन होते.
हे मातृभूमि हे माझे आई मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन माझी भाषा माझी वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे माझे शब्द तुझ्या दुधाने न्हाऊन निघाली आहेत.
0 टिप्पण्या