मुंगी आणि नाकतोडा

कडक उन्हाळ्याचे दिवस होते . वातावरण खूप  प्रसन्न होते. सगळीकडे धान्य भरपूर पिकले होते एक नाकतोडा गाणे गाण्यात रंगून गेला होता त्याला खाण्यास सगळीकडे भरपूर होते.

 मुंग्या मात्र अन्नाचे कण गोळा करून बिळात नेत होत्या नाकतोडा त्यांना उपहासाने म्हणाला मला तुमची कीव वाटते. एवढ्या प्रसन्ना दिवशी खेळायचे सोडून तुम्ही काम करत आहात. मुंग्या म्हणाल्या आम्ही हिवाळ्यासाठी खूप अन्नसाठा करत आहोत. तू सुद्धा खूप अन्न   साठव .परंतु नाकतोड्याने मुंग्यांच्या म्हणण्याकडे  दुर्लक्ष केले.

 लवकरच थंडीचे दिवस सुरु झाले . सर्वत्र कडाक्याची खूप थंडी पडली होती. अन्न कोठे मिळेनासे झाले  होते .नाकतोड्याला उपाशी राहावे लागले तो मुंग्याकडेअन्न मागायला गेला तेंव्हा  मुंग्या म्हणाल्या अरे आळशी नाकतोडया. संपूर्ण उन्हाळा  तू नाचण्या गाण्यात घालवलास आम्ही तुला सांगितले होते .तु भविष्याचा विचार केला नाहीस आता जाऊन नाच करत बस .आम्ही तुला काहीही मदत करणार नाही.

              तात्पर्य  -भविष्यासाठी केलेली बचत खूप उपयोगी पडते