लोभी कुत्रा
एका गावामध्ये एक दिवस एक कुत्रा अन्न शोधत फिरत होता. वाटेत त्याला एक मेलेल्या प्राण्याचे हाड सापडले. ते हाड तोंडात धरून तो जोरात चालू लागला. वाटेत ओढ्यावर एक मोठा पूल होता.
ओठ्यावरील पूल ओलांडताना त्याने पाण्यात पाहिले त्याला पाण्यात आपली प्रतिमा दिसली. त्याला वाटले दुसरा कुत्रा तोंडात हाड घेऊन उभा आहे.त्याला दुसरे हाड मिळविण्याची खूप इच्छा झाली.
दुसऱ्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी त्याने आपले तोंड उघडले. त्याच वेळी त्याच्या तोंडातील हाड पटकन पाण्यात पडले. अशाप्रकारे कुत्र्याने लोभामुळे आपले अन्न गमविलेवत्याचे नुकसान झाले .
तात्पर्य -लोभीपणामुळे नेहमीनुकसान होते .
0 टिप्पण्या