माझ्या आज्यानं पंज्यानं

कवी पुढच्या पिढीतील तरुणांना म्हणतो माझ्या आजोबांनी आणि पणजोबांनी रोज उनाड झालेल्या बैलांना काबूत आणण्यासाठी वैसणी विनल्या तेव्हा शेतामध्ये पेरणी करता आली.

 आणि माझ्या आजोबा पणजोबांनी पिकलेल्या धान्याची राखण करण्यासाठी गोपणी विनल्या तेव्हा नित्यनेमाने आपल्या प्राणाचे शिवाराचे रक्षण झाले.

 माझ्या आजोबा पणजोबांनी रहाटाच्या आधारा विहिरीतले पाणी उपसण्यासाठी मोठे मोठे दोरखंड वळले तेव्हा पाट भर भरून तुझ्या रानातील मोट व्यवस्थित चालली नी पिकांना पाणी मिळाले.

 माझ्या आजोबा पणजोबांनी रोज काथ्या आवळून खाटा विनल्या म्हणून काबाडकष्ट करून आलेला घामाने चिंब झालेला शेतकरी राजा त्यावर विसावा घेतो.

 माझ्या आजोबा पणजोबांनी गुरांना बांधण्यासाठी रोज दो-या वळल्या तेव्हा दुभत्या म्हशीला दावनीणे गोठ्यात बांधता आले.

 त्यामुळे घराला दुधदुपते मिळाले माझ्या वाडवडिलांनी माझ्या आजोबा पणजोबांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून दूरदर्शीपने आपल्या घरातल्या पोरा बाळांना शाळेत शिकवले तेव्हाच कष्ट करणाऱ्या या आयुष्याला सोन्याचे दिवस आले पूर्वजांच्या कष्टामुळे व त्यांनी पुढची पिढी शिकल्यामुळे शेतकऱ्याच्या आताच्या जीवनात समृद्धी आली.