असे जगावे
आयुष्य संपन्नपने व समृद्धपणे कसे जगावे हे सांगतांना कवि म्हणतात जीवन जगताना समोर कितीही कठीण आव्हाने आली तरी अत्तरा सारखी छातीवर घ्यावी संकटांना सुगंधी अत्तर समजून ती सहज लीलया पेलावीत अशा खडतर आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता उत्तर द्यावे.
ग्रहताऱ्यांची आंधळी भीती बाळगून नक्षत्रांची गुलामी स्वीकारू नये आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस पुरवून घ्यावी आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावे ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या होतात जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच आयुष्याच्या नजरेला नजर देत ठामपणे जगावे.
जगताना पाय जमिनीवर ठेवावेत वास्तवाचे भान ठेवावे आणि मग मिठीत आकाश घ्यावे अशक्य गोष्ट सहज शक्य करावी इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओठांवर हास्य ठेवावे संकटांना बजावून सांगावे की तुम्ही आलात तरी मी तुमची पर्वा करीत नाही आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर द्यावे.
या दुनियेतून कायमचे निघून जाताना आपले कर्तृत्व मागे ठेवून असे जावी की सगळ्या जगाचे हृदय हेलावून जायला हवी आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवी असे समृद्ध कार्य करून जावे काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा कातर व्हावा गलबलून जावा आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोक उत्तर द्यावे.
0 टिप्पण्या