असा रंगारी श्रावण 

श्रावण महिन्यात निसर्गातील विलोभनीय व मनोहर दृश्याचे वर्णन करताना कवी म्हणतात श्रावण हा रंगाचा जादूगार आहे तो सृष्टी मध्ये विविध रंग उधळीत येतो सृष्टीचा हा चित्रकार आपल्या दिव्य कुंचल्याने हिरवा देखावा रेखाटतो.

 श्रावण हा सुंदर कलाकार आहे त्याची किमया काय सांगावी हा किमयागार अजब आहे जागोजागी निसर्गात जणू त्याने चित्रांची रांग मांडली आहे सर्वत्र पंगतीत बसलेली चित्रे आहेत.

 हा श्रावण दरी खोऱ्यात डोंगरात नाचतो नदी बरोबर झिम्मा खेळतो रिमझिम  सरींचे मधुर गाणे तो झाडांशी बोलतो.

 वेलीच्या तो जेव्हा वेण्या घालतो तेव्हा वेली लाजून चूर होतात वेली मग पानाफुलांचे पातळ नेसून थेंब ठसवून सजतातत नटतात.

 पोरीबाळींना झोका घेण्यासाठी श्रावण झाडांना झुले टांगतो. त्यांना झोके देतो झुलवता झुलवता मुलींच्या गाण्यांना नादमय लय देतो.

 लहान मुलांच्या खेळण्यात श्रावण त्यांचा सवंगडी होतो आणि दही हंडीच्या काल्यात त्यांच्यासंगे प्रेमाने संपूर्ण चिंब भिजलेला बाळकृष्ण होतो.

 शुभ्र उन्हात  तो पावसाचे घर बांधतो आणि खोडकर श्रावण पावसाची खोड काढून मस्करी करून झाडामागे लपतो.

 आकाशाच्या अफाट निळाईत श्रावण इंद्रधनुष्याचा सप्तरंगी बांध घालतो रंगबेरंगी फुलांची नक्षी हिरव्या रानात सजवतो ठसवतो.

असा हा कलावंत रंगारी श्रावण रंग उधळीत येतो आणि हिरव्या निसर्गाच्या मळ्यात आपले घरटे बांधून राहतो.