एकदा जंगलामध्ये सणाचे दिवस होते. दोन मांजरे एकत्र आनंदाने जंगलामध्ये फिरत होते. एक ठिकाणी मांजरला एक मोठा केक दिसला आणि मांजर आनंदाने जोरात ओरडले.इतक्यात दुसर्या मांजराने अचानक उडी मारली व केक उचलला. पहिले मांजर रागाने म्हणाले मला केक दे कारण मी तो प्रथम पाहिला आहे.
त्यावेळी पहिले मांजर म्हणाले तू केक पासून दूर रहा तो केक मी आता घेतला आहे. ते खूप जोरात भांडू लागले परंतु काही फायदा झाला नाही.भांडण काही संपेना. तेवठ्यात तेथून एक माकड जात होते त्याने विचार केला काय मूर्ख मांजरे आहेत मला याचा फायदा उठविला पाहिजे म्हणून माकडाने त्यांची गमत करायचे ठरवले.
तो हुशार माकड मांजरा कडे आला आणि जोरात ओरडला भांडू नका मी याची समान वाटणी करतो हे मांजराना पटले दोघांनी केक माकडाकडे दिला.माकडाने केकचे दोन असमान तुकडे केले. तो मान हलवून म्हणाला अरे यातील एक तुकडा मोठा झाला आहे . असे म्हणून त्याने तुकड्यातील काही भाग खाल्ला व नंतर म्हणाला अरे हा तर खूप छोटा झाला. त्याने दुसर्या केकचा तुकड्यातील थोडा भाग खाल्ला असे करत करत त्याने सर्व केक खाउन टाकला . बिचारी मांजरे हताश झाले व त्यांना त्यांची चूक कळाली.
तात्पर्य - आपण आपसात भांडण करत बसलो तर त्याचा फायदा नेहमी तिसऱ्यालाच होतो .
0 टिप्पण्या