श्रावण मास
श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते ऊन-पावसाचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुफेडी गोफ विणलेला दिसतो इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे.
ढग दाटून आल्या मुळे सुर्यास्त झाला नी संध्याकाळ झाली असे वाटते. वाटते न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे उन उंच घरावर आणि झाडाच्या शेंड्यावर झळकते.संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात जणू ते ढग संध्याराग गात आहेत. सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कोणी रेखाटले आहे असे वाटते.
आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्प फुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धर्तीवर उतरले आहेत असे वाटते नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी फडफडत आहेत हिरवळीवर आपल्या पालकांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत.
हिरव्या माळरानावर गाई गुरे वासरे मजेत चालत आहेत आणि गुराखी सुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत गुराख्याच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत सोनचाफा फुलला आहे आणि राणा मध्ये सुंदर केवडा दरवळत आहे फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते.
फुलमालासारख्या सुंदर मुली सजून-धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे ते गाणे त्यांच्या मुखावरुन वाचता येते.
0 टिप्पण्या