शेतकरी आणि जादूचे बदक

 एक गावात एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप दारिद्र्य व गरीब  होता. एके दिवशी त्याला जंगलात फिरत असताना  एक जादूचे बदक मिळाले.ते रोज एक सोन्याचे अंडे देत होते . तो दररोज ते अंडे विकून घरासाठी नवनवीन वस्तू विकत आणत असे. लवकरच तो खूप श्रीमंत झाला.

 एके दिवशी त्याच्या मनात वाईट कल्पना आली. बदक रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर .त्याच्या पोटामध्ये कितीतरी सोन्याचे अंडे असतील.मी जर बदकाचे   पोट कापले तर मला सर्व अंडी एकदम मिळतील व मी आणखी खूप श्रीमंत होईल असे त्याला वाटले .

 त्याने एक दिवस बदकाला मारायचे ठरवले बदकाला मारण्यासाठी  त्याचे  पोट कापले पण त्याला आतमध्ये  एकहीअंडे  मिळाले नाही.

 त्याच्या या अतिलोभामुळे त्याने जादूचे बदक गमावले तसेच दररोज मिळणारी  सोन्याची अंडी देखील गमावली  .


तात्पर्य - अतिलोभामुळे नेहमी नुकसानच होते .म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ करू नये .