गवतफुला रे गवतफुला

माळावर पतंग उडवणाऱ्या एका लहान मुलाला इवलेसे गवतफुल दिसते गवतफुला च्या रूपाने मुलगा मोहून गेला गवतफुला ला उद्देशून तो म्हणतो हे रंगबिरंगी इवल्याच्या गवतफुला तुला पाहताच माझे मन मोहून गेले असा कसा तुझा लळा मला लागला ते सांग.

 मित्रांबरोबर माळावरती पतंग उडवीत फिरत असताना अचानक तुला मी गवतावर पाहिले तुला झुलत झुलत हसताना पाहून मी आकाशातला पतंग विसरून गेलो मी मित्रांना हि विसरलो तुझ्या विविध रंगछटा पाहून मी मुग्ध झालो हरखून गेलो.

 हे गवत फुला तुझ्या दोन्ही बाजूंना हिरवी शी नाजूक रेशमासारखी तलम पाती आहेत निळीनिळीशी एक पाकळी व त्यामधून चमकणारे पिवळे पराग आहेत तुझ्या तळाला पुन्हा एक गोजिरवाणी लाल पाकळी फुलली आहे उन्हामध्ये झगमगणारी तुझे हे रंग पाहून माझे भान हरपून गेले मी तुझ्या रंगात दंग  झालो.

 तुझे एवलेसे रोप घेऊन स्वतः वाराही लहान झाला तुझ्याबरोबर तो झुला बनवण्याचा खेळ खेळू लागला रात्र सुद्धा लहान होऊन तुझ्यासाठी अंगाई गीत गात आहे मलाही तुझ्या पेक्षा लहान होऊन शाळा सगळे विसरून तुझ्यासोबत राहावेसे वाटते.

 हे गवतफुला मला असे वाटते की तुझ्या चिमुकल्या गोजिर्‍या मुलांची भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात तुझे सगळे खेळ मी शिकावे आणि मला येणाऱ्या जादूच्या गोष्टी तुला शिकवण्यात आकाशाकडे हट्ट करावा तुझ्या सोबत खाऊ खावा तुझे रंगीत कपडे घालून फुलपाखरांची फसगत करावी इतका तुझ्यासारखा दिसावा फुलपाखरू ही मला पाहून फसेल.