बहुमोल जीवन


आपल्या आयुष्यात सर्व काही आपल्या मनासारखे घडत नाही फुले गळून पडली तरी झाड एक सारखे वठत नाही.

 जे जे वाट्याला येईल पदरात पडेल तेथे सर्वांना सहन करावे लागतेच आपल्या आसपास काटे आहेत म्हणून गुलाब तक्रार करीत नाही दोष देत नाही आपल्याला काटे दिले म्हणून वेल कधीही मातीवर रागवत नाही सर्व काही मनासारखे जीवनात मिळत नाही.

 वसंत ऋतू येतो आणि जातो कडक उन्हाळा धरतीला जाळतो पण पुढे पावसाळा येताच धरती हिरवा शालू नेसते पुन्हा सृष्टी नवीन होते आपले शरीर उन्हाने जळले म्हणून धरती रडत बसत नाही या जीवनात मनाप्रमाणे सर्व काही घडत नाही.

 दररोज आकाशाचे रंग बदलतात तरीही काळे ढग दाटून येतात निराशेत बुडालेली तारे पुन्हा नव्याने लखलखतात.अमावस्येला चंद्र दिसत नाही अंधारी रात्र असते म्हणून पौर्णिमा कधी रुसून बसत नाही मनासारखे आपल्याला आयुष्यात घडत नाही.

 कधी सुख येते कधी दुःख येते सुखाचे ऊन आणि दुखाची सावली येते मी निघूनही जाते याचा राग येता कामा नये सहजपणे संकटांना सामोरे जावे आयुष्य सोडून देऊ नये हे मानवी जीवन फार किमती वअमूल्य आहे ते पुन्हा पुन्हा माणसाला मिळत नाही एकदाच आयुष्य मिळते कारण आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी कधी जीवनात घडतात का मुळीच नाही.