या काळाच्या भाळावरती

हा जो आताचा काळ आहे त्या काळाच्या कपाळावर तू एक तेजाचा गोल टिळा लाव आणि तुझ्या अविरत कष्टामधून माणुसकीचा मळा फुलू दे.

 तो सतत नवनवीन स्वप्ने पहा आणि ती स्वप्ने सत्यात साकारण्याचा अथक प्रयत्न कर सूर्यफुलाच्या बागा फुलवून त्यांचा प्रकाश प्रत्येक घरात येऊ दे खळखळ आवाज करीत संपन्नतेच्या नद्या वाहत येउ दे.

 काट्याकुट्यांच्या  अवघड वाटेवर चालत तू पुढे पुढे जा अडचणीतून मार्ग काढ याच वाटा तुला पाऊस दाटून आलेल्या आकाशाकडे नेतील आतापर्यंत सोसलेल्या उन्हाच्या झळा संपतील आणि पावसाच्या धारा तुझ्याकडे नाचत येतील.

हा अंधार तुडवून त्याला भेदून तू नवीन पहाट तुझ्या जीवनात घेऊन ये. हि पहाट आपल्या कण कण उजेडाने या धरतीचे नशीब उजळेल हा पहाटेचा प्रकाश डोंगराला समुद्राला इथल्या खडकांना सोन्याची सुंदर झळाळी देईल.

 आभाळात उंच भरार्‍या मारुन जगण्याच्या नवीन दिशा शोधून काढ नवीन वारी आणि नवी प्रभात तू घेऊन ये तुझ्या कतृत्वाची गाणी मग या धरतीवरल्या शिळाही गातील.