थेंब आज हा पाण्याचा
शब्दांपेक्षा अर्थाला जास्त महत्त्व आहे म्हणून शब्द जाऊ दे अर्थ राहू दे आभाळातून पडणारा व जीवनाला खूप मौल्यवान असणारा जो पाण्याचा थेंब आहे तो गाण्याचा विषय होऊ दे.
पावसाच्या सरी मधून हे थेंब मोती बनून सरसर खाली येतात जणू एखादी सुंदर परी थेंबांची माळ ओवते नी पुन्हा ती माळ निसटून मोती विखुरतात तेव्हा ती बावरते या मोती रुपी थेंबांचा संग्रह कर कारण यावरच तुझे जगणे अवलंबून आहे आभाळातून बहुमोल असा आज पाण्याचा थेंब तुझ्यासाठीच खाली येत आहे.
आभाळातले हे मोती मातीवर बरसतात व त्यातून मोत्यासारखी पिके येतात निसर्गाला पाण्याचे मोल कळले आहे माणसे मात्र संकुचित वृत्तीने वागतात माणसे खळखळणाऱ्या तिजोरीत असलेल्या नाण्यांचा संग्रह करण्यात धन्यता मानतात आभाळातून मौल्यवान बरसणाऱ्या पाण्याच्या थेंबा कडे दुर्लक्ष करतात.
संपत्ती गोळा करण्याचा हा वेडा नाद कशासाठी या तुम्ही स्वतः फसत आहात निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता तरी बदलायला हवा पाण्याचा आदर करायला हवा सोन्याचा घोट घेऊन तुमची तहान शमेल का तहानेसाठी आभाळातून बरसणारा बहुमोल पाण्याचा थेंबच आवश्यक आहे.
0 टिप्पण्या