छत्रपती शिवाजी महाराज

आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२१   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच शांतपणे बसलेले विद्यार्थी व विद्यार्थिनींना व माझे गुरूजनना व प्रतिमेच्या स्वरूपात असलेले छत्रपती शिवाजी महाराज.

 विद्यार्थी  मित्रांनो मी आज आपल्याला  शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर दोन शब्द सांगत आहे कृपया आपण शांतपणे ऐकावे हीच विनंती करतो . ते दिवस फार धावपळीचे होते शहाजीराजे युद्धात गुंतलेले असताना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे 19 फेब्रुवारी १६३०  ला त्यांनी  एका सुंदर बाळाला  शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. व  त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले मित्रांनो शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर या गावी आहे शिवाजी महाराजांचे बालपण सहा वर्ष धावपळीत गेले. त्याची आई जिजाबाई शिवाजी महाराजांना कृष्णाच्या गोष्टी सांगत असे साधुसंतांच्या गोष्टी त्यांच्या मनात आदर निर्माण करत होत्या शिवाजी महाराज उत्तम प्रकारे शस्त्रविद्या ग्रहण करीत होते वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध विद्या व कला याचे ज्ञान प्राप्त केले मित्रांनो जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूंचा दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे हे उत्तम प्रकारे शिकविले.

 मित्रांनो शिवरायांचे लग्न वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांच्या आईने सईबाई नावाच्या मुली सोबत लावून दिले पुण्याच्या लाल महालात लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला एकदा अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटीत मारण्याचा प्रयत्न केला . त्यांन खानाचा  कपटी डाव  माहीत होता. म्हणून त्यांनी अंगात चिलखत घातले होते नाहीतर शिवाजी महाराजांना आपले प्राण गमवावे लागले असते अशाच एका दुसऱ्या प्रसंगाचा सामना करताना त्यांनी चक्क शाहिस्तेखानाची बोटे कापली एकदा औरंगजेब बादशहाचा 50 वा वाढदिवस होता त्यांनी शिवाजी महाराजांना बोलवन आपल्याकडे नेले होते .त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे ठेवण्यात आले होते त्यावेळी नातेवाईकांना मिठाईचे पेटारे वाटून त्यांनी त्यातून स्वतःची सुटका करून घेतली त्याचबरोबर त्यांची इतर सहकार्‍यांची सुटका झाली ही घटना १६६६ 

मध्ये घडली त्या काळात शिवाजी महाराजांनी समुद्रात सिंधुदुर्ग विजयदुर्ग यासारखे भक्कम किल्ले बांधले गेले जर आपण बघितले तर आपली मान उंचावते आपल्या मराठी भाषेला मायबोलीचा दर्जा मिळावा म्हणून ते आयुष्यभर झटत राहिले व अखेर यशस्वी झाली माझ्या विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजां बद्दल जेवढे बोलू किंवा सांगू तेवढे कमीच आहे आणि प्रसंग त्यांच्या जीवनात आली त्यातील एक मी शेवटचा प्रसंग तुम्हाला सांगतो एकदा काय झाले की कोंडाना किल्ला शिवाजी महाराजांना कोणत्याही परिस्थितीत पाहिजे होता म्हणून त्यांनी तानाजी मालुसरे यांना विनंती केली तानाजीच्या घरी मुलांच्या लग्नाला चार दिवस बाकी होते हे पाहून शिवाजी महाराजांनी लग्न करण्यास सांगितले पण तानाजी स्वतः म्हणाले आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे मावळे आपले ५००  सैन्य घेतले व अधिक मावळे घेतले व कोंडण्या कडे  आगेकूच केली त्यात त्यांचा मृत्यु  झाला पण सैनिकांनी तानाजीचा भावासोबत घनघोर युद्ध सुरू ठेवले कोंडाण किल्ला जिंकला पण वीर पराक्रमी शहीद झाली म्हणून त्यांच्याबद्दल ऐकताच शिवाजी महाराज व त्यांची आई जिजाऊंना फार दुःख झाली शेवटी त्यांनी एकच वाक्य म्हणाले  गड आला पण सिंह गेला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.

 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र