एका गावामध्ये शेतातला उंदीर व गावातला उंदीर दोघे मित्र होते.एकदा शेतातल्या उंदराने गावातील उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले दोघे शेतात जेवणास बसले. त्यांनी बोरे शेंगा आणि फळे खाल्ली जेवण झाल्यावर गावातील उंदीर उपहासाने म्हणाला काय बेचव जेवण आहे मला तुझ्याकडे जेवण आवडले नाही एकदा माझ्याबरोबर चल आणि चांगले अन्न कसे असते ते पहा दोघेजण गावाकडे निघाले .
गावातला उंदीर एका घरात मोठ्या राहत असे ते दोघे स्वयंपाक घरात जेवायला बसले गावातील उंदराने केक बिस्किटे आणि पाव खाण्यास दिला ते खाण्यास सुरुवात करणार इतक्यात अचानक मांजराचा आवाज आला ते बिळात पळाले थोड्यावेळाने दोघे पुन्हा आले परत मांजराचा आवाज आला ते बिळात पळाले . अशा प्रकारे त्यांना जेवणातून अनेक वेळा जीव वाचवण्यासाठी बिळात पळावे लागले
शेतातील उंदीर म्हणाला किती दुखी जीवन आहे रे तुझे निदान मी माझ्या शेतात शांतपणे जगू शकतो
तात्पर्य - श्रीमंती लोक सुखी असतातच असे नाही
0 टिप्पण्या