साने गुरुजी 

आज दिनांक 24 डिसेंबर 2021 आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणीणो आज मी तुम्हाला आज आदरणीय साने गुरुजी यांच्या जीवनावर दोन शब्द  थोडक्यात आपणास सांगणार आहे.कृपया लक्ष द्यावे.

 संपूर्ण जगाला मानवधर्म शिकवणारे साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने होते मित्रांनो त्यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी सण 24 डिसेंबर 1899 ला झाला मित्रांनो साने गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते.त्यांच्या आईने लहानपणी त्यांना चांगले संस्कार दिले होते त्यांनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सांगितले आहे मित्रांनो बी ए आणि एम ए झाल्यावर साने गुरुजींनी अमळनेर मध्ये प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षकाची नोकरी केली.

 विद्यार्थी मित्रांनो ते काही साधे शिक्षक नव्हते त्यांनी आपल्या शब्दांच्या जादूने संपूर्ण वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना मोहित करून सोडले व 1928 मध्ये त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केले मित्रांनो तो काळ म्हणजे आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता त्यांच्यावर महात्मा गांधींचा राजकीय प्रभाव होता आतापर्यंत असा एकही शिक्षक आपण पाहिला नाही की त्यांनी स्वतःची नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला असेल पण साने गुरुजींनी ते करून दाखविले होते अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले मित्रांनो तुरुंगात असताना त्यांनी खालील कविता लिहिली 

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. हे उरले मी सिद्ध मरायाला हो. विद्यार्थी मित्रांनो ही कविता आपण मरेपर्यन्त विसरणार नाही ही कविता राष्ट्रीय एकता राष्ट्र सेवेची प्रेरणा देते सानेगुरुजी व अनेक अडचणीवर मात केली अनेक अत्याचार सहन करून उत्कृष्ट साहित्यिक झाले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली या महान क्रांतिकारी शिक्षकाला काही दुष्ट समाजातील लोकांकडून अपेक्षाभंग झाल्यामुळे स्वतःचे जीवन 11 जून 1950 रोजी संपविले.

 अशा महान आत्म्याला व क्रांतिकारी गुरुजीला मी कोटी कोटी प्रणाम करतो व माझे भाषण संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र.