माय

आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते तेव्हा त्या गाईच्या रूपात मला माझी आई दिसते.

 माझी आई जळणा साठी लागणारी लाकडे वेचायला रानात जायची तिच्या पायात साध्या चपला नसायच्या अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला परवा नसे आमच्यासाठी कष्ट उपसताना तिला काट्याकुट्यांची मोजदादच नव्हती.

 मी शाळेत शिकायला दूर होतो मी जेव्हा सुटीमध्ये घरी यायचो तेव्हा ती उसने पासने आणून मला वेगवेगळे पदार्थ जेऊ घालायची घाई करु नको सावकाश पोटभर खा असे ती मला मायेने  सांगायची माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणे लावायचे की बस झाले आता पोराचे शिकणे त्याला नांगर धरायला शेतीची कामे करायला लाव शिकून काही तो मोठा साहेब होणार आहे का मला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा प्रयत्न करीत असत.

 बाबांना आई म्हणायची कि तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ घालते असे भलतेसलते सांगून मुलाचे कान भरू नका हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापी व पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे.

बोलता बोलता एकदा आईच्या डोळ्यात अश्रू दाटले ती म्हणाली की माझ्या राजा तुझी राणी कधी दिसेल मला माझी सून कधी आणशील मी असेपर्यंत लग्न झाले तर माझ्या डोळ्यांनी मी दुधावरच्या सायीसारखी सुख पाहीन तुझा संसार फुललेला पाहीन नातवंडे खेळविन.

 ही सर्व आईची माया आठवून मला असे वाटते की आई तुझी ओटी सुखाने भरावी तुझ्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा आणि तुझे पाय घट्ट धरून ठेवावेत तुझ्या चरणापाशी राहावे तुझा कायम आशीर्वाद मिळावा.