चलाख विक्रेता

एका गावामध्ये एक चलाख विक्रेता होता. तो लोकांबरोबर खूप हुशारीने वागायचा. एकदा छोट्या मुलाने त्याच्याकडून बोरे घेतली होती . 

 व विक्रेत्याने त्याला वजनापेक्षा बरीच  कमी बोरी दिली.मुलाने विक्रेत्याला  विचारले तुम्ही मला कमी बोरे का दिली विक्रीत्याने उत्तर दिले तुला कमी बोरे न्यायला सोपी पडतील म्हणून मी तुला कमी बोरे दिली . आता मला माझे  पैसे दे.

 मुलाने त्याच्या हातावर काही नाणी ठेवली व  तो परत जाऊ लागला विक्रेत्याने दिलेले  पैसे मोजले व ते कमी असल्याचे लक्षात आले.

 विक्रेता मुलावर ओरडला  हे मुला तू मला कमी पैसे का  दिले आहेत. त्यावर मुलगा शांतपणे  म्हणाला कमी पैसे मोजायला सोपे जातील म्हणून मी तुम्हाला कमी पैसे दिले .

                                                         तात्पर्य  -प्रत्येकाला जश्याच तशी उत्तरे देणारी माणसे भेटतात