गोमू माहेरला जाते
अहो नावाडी दादा नुकतीच लग्न झालेली नववधू गोमू सासरहून कोकणला माहेरला जाते आहे ती व तिचा पती होडीत बसले आहेत तिच्या नवऱ्याला कोकणातला निसर्ग दाखवा कोकणातील निळ्या पाण्याची खाडी दाखवा खाडीच्या दोन्ही काठावर असलेली हिरवीगार झाडाची राई दाखवा भगव्या रंगाचा अबोलीच्या फुलांचा मनोहर गुच्छ दाखवा.
कोकणात राहणारी माणसे अगदी साधी भोळी भाबडी आहेत त्यांच्या मनात जणू कोवळ्या नारळाचे गोड पातळ खोबरे आहे म्हणजे कोकणी माणसांची मने मृदू आहेत किनार्यावर उंच उंच झाडांची रांग आहे त्यांची उंची जवळून मापता येईल त्यांना माडाची झाडे दाखवा.
हे अवखळ चंचल वाऱ्या आता तुझा सर्व खोडकरपणा सोडून या होडीच्या शिरांमध्ये ये इकडे तिकडे न फिरता शिडात शिर म्हणजे होडी किनार्याला लागेल पहा किनारा अगदी जवळ आला आता आपली नौका पटकन किनाऱ्याला टेकऊया. नववधू माहेराला जायला अधीर झाली आहे.
0 टिप्पण्या