संत गाडगे महाराज

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय गावातील पाहुणे व खाली शांतपणे बसलेली विद्यार्थी व माझे गुरूजन मी आज तुमच्या समोर एका महान समाजसेवक संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर थोडक्यात पण काही महत्वाचे भाषण रुपी दोन शब्द सांगत आहे

 तर विद्यार्थी मित्रांनो मी त्या महान व आदर्शवादी व्यक्ती बद्दल बोलत आहे ज्यांनी असे महान काम केले पण शिक्षण म्हटलं तर शुन्य संत गाडगे महाराज यांचा जन्म सन 1876 साली झाला .त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखुबाई असे होते त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती मित्रांनो लहान असताना गाडगेबाबा हे दहा ते बारा गुराखी मित्रांना घेऊन गुरे राखायचे एकदा त्यांनी सावकारांचा कर्ज चूकविण्यासाठी कापूस तुरी ज्वारी दिली आणि त्याची पावती मागितली त्या काळात कोणत्याही प्रकारचे लिखाण करत नव्हते व्यवहार तोंडी चालायची पण गाडगेबाबांची समाधान झाले नाही गाडगेबाबांनी सावकाराच्या मूर्खपणामुळे त्याच्या माणसांना बेदम चोपून काढले आणि सावकार सुद्धा गाव सोडून पळून गेला तेव्हापासून लोक त्यांना पराक्रमी डेबूजी म्हणू लागले.

 मित्रांनो गाडगेबाबांना लग्नाच्या दोन वर्षानंतर एक मुलगी झाली म्हणून गावातील नागरिकांनी कोंबड्या पत्रिका छापायला तयार झाली पण गाडगेबाबांनी साधे जेवण करून लोकांना खाऊ घातले.

 मित्रांनो गौतम बुद्ध सारखे त्यांनीसुद्धा परिवाराला सोडुन संसार मुक्त झाले आता ते खापर घेऊन भाकरी मागत खात होते एका हाताने झाडू घेऊन संपूर्ण गावाचा रस्ता साफ करत असे व स्वतः फाटके कुर्ते व रस्त्यावर पडलेल्या चिंध्या गोळा करायचे गावातील कुणा व्यक्तीला सुईदोरा मागत व त्यांच्याकरिता जमा झालेल्या चिंध्या यांची लुंगी शिवत होते या वेशात ते गावोगावी जाऊन स्वतः मोहीम राबवत होते मित्रांनो शिक्षणाचा कसलाही गंध त्यांना नव्हता तरी त्यांनी अनेक भजन ओव्या गात असत कर्ज काढून देवाची यात्रा करू नका गाई बैल यांची काळजी घ्या मुलांना शाळेत पाठवा देवाला नवस म्हणून कोंबडा बकरा कापून नका हा फार महत्त्वाचा संदेश या देशाला त्यांनी दिला पुढे त्यांनी धर्मशाळा बांधल्या दवाखाने उघडले कुष्ठरोग्यांना त्यांनी स्थान दिले व पुढे त्यांना गावोगावी कीर्तन करायला बोलत होते त्यांनी सांगितलेला संदेश ऐकत होते ह्या महात्म्यांनी समाजातून पैसा एकत्रित करून व वृद्ध लोकांसाठी वृद्धाश्रम उघडली ते नेहमी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे आपल्या  कीर्तनात म्हणत होते.

 मित्रांनो त्यांची ही मोलाची कामगिरी पाहून सध्या आपल्या देशात संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान ही योजना राबवीत आहे नवस करून बाईला मुल होत असतील तर बाईला नवऱ्याची गरजच नाही असा ठाम टोला अंधश्रद्धेवर त्यांनी मारला व 20 डिसेंबर 1956 साली त्यांनी जगाचा नेहमीकरिता निरोप घेतला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद जय महाराष्ट्र