नव्या युगाचे गाणे

 अनु रेणू च्या अतिसुक्ष्म कनाकनातुन शब्द प्रकटत आहे जनहो चला चला पुढे चला विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे हे विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे त्याची तेजस्वी आभा सर्वत्र दिसत आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हाला आली आहे.

 मना मनात खोलवर असलेली अस्वस्थतेची अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे

 नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेच अवतरले आहे माणुसकीच्या मार्गावर देशाच्या नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजीवीतेची अमरत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकात्मतेची माळ तयार करूया.

 आता उदासपणा नको दैन्य दारिद्र्य नको या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवत आहे उत्कर्षाचा प्रगतीचा प्रकाश दाही दिशांत झळकतो आहे. दैण्याच्या अंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे.

 रक्तारक्तात नवीन जोश नवीन उत्साह उसळत आहे नवीन अशा मनातल्या मनात रुजल्या आहेत या उज्वल विज्ञान युगातील अनु रेणू तुनी शब्द प्रकटत आहे लोकहो पुढे चला प्रगती करा.