उंदीर आणि बैल

कडक उन्हाळ्याचे दिवस होते. एक बैल झाडाच्या सावलीला शांत झोपला होता. तो जोर जोरात घोरत होता.तेथून एक छोटा उंदीर ऐटीत  जात होता. त्याला बैलाच्या घोरण्याबद्दल  खूप कुतूहल वाटले.

 गमत करण्यासाठी उंदीर बैलाच्या नाकावर चढला व मजा म्हणून हळूच चावला. बैल जागा झाला आणि रागाने म्हणाला मला कोणी जागे केले लवकर सांगा . आणि कोण चावले उंदीर म्हणाला मला क्षमा कर मी तुमची मजा केली पण तुम्हाला   जागे करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता.

 बैलाला खूप राग आला त्याने छोट्या उंदराचा पाठलाग जोरात  सुरू केला. उंदीर जीव वाचवण्यासाठी दगडी भिंती च्या बिळात आतमध्ये लपला. व बैल काय करतो आहे याची वाट बिळात बसून  पाहू लागला.

 बैल रागाने पळत भिंतीपर्यंत आला .परंतु तो उंदराला पकडू शकला नाही कारण उंदीर खूप आतमध्ये लपला होता . बैल  ओरडला हे शूद्र प्राण्या मी तुला चांगलाच धडा शिकवीन त्याने भिंतीला जोराची  धडक मारली भिंत खूप मजबूत होती.

उंदीर बैलाला भीत भीत म्हणाला एवढ्या लहान गोष्टीसाठी तू आपले डोके का फोडून घेतोस. बैल तिथून शेवटी  निघून गेला.

 तात्पर्य  - प्रत्येक वेळेस शक्ती कामास येते असे नाही म्हणून शक्तीचा जास्त गर्व करू नये .