भारत देश महान
देशवासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारतवासी जनहो चला आपण आता भारत देश महान आहे हे गीत एक मुखाने गाऊ या आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊया माझ्या भारत भूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत गंगा यमुना गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूमीला आंघोळ घालत आहेत भारत भूमिचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा शौर्याचा व पराक्रमाचा आहे राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे या भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी जै विर शौर्याने लढले स्वातंत्र्य संग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्र झाले त्यांच्या बलिदानाने भारत भूमीचे स्वप्न रंगले आहे याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो.
0 टिप्पण्या