माझी मराठी
मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान गाताना कवयित्री म्हणतात माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते कृतज्ञ राहते तिच्या उपकारांची फेड कधी करू नये तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असे वाटते.
माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नांचे सुवर्णाचे मोल आहे माझा मराठी शब्द अनमोल आहे कधी उष्ण लोखंडासारखी धग त्यात असते तर कधी तो थंडगार चांदण्यान सारखा सुखद असतो.
माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासात भिजते तिला रानातल्या वा-याचा सुवास असतो विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा समजली आहे.
सजली आहे माझ्या मराठी भाषेचे अमृत जो कोणी पिऊन घेईल तो खराखुरा भाग्यवान ठरेल नशीबवान असेल कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करीत नाही माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी ती अवर्णनीय आहे दूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरली आहे माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातही ऐकू येते.
0 टिप्पण्या