ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा राहत होता .सशाला आपल्या खूपच वेगाचा गर्व होता. तो कासवाच्या हळू चालल्याबद्दल नेहमी हसायचा व त्याला चिडवायचा. तरीही कासव कधीच चिडत नसे. पण सशाने कासवाला चिडवणे सतत चालूच ठेवले.
एके दिवशी कासवाने सश्याशी पळण्याची शर्यत लावली होती . ससा आश्चर्यचकित झाला त्याला नवल वाटले . त्याला वाटले हळू पळणारा कासव मला कसे आव्हान देत आहे. ठरल्याप्रमाणे शर्यत सुरू झाली आणि क्षणात ससा खूप पुढे गेला.
ससा जिंकण्याच्या जागे जवळ आला आणि त्याने विचार केला आपण कासवासाठी थांबूया व कासव आल्यावर उडी मारून शर्यत जिंकूया ससा झोपी गेला.
थोड्या वेळाने त्याला जाग आली त्याने पाहिले कि कासव शर्यत जिंकण्याची रेषा पार करत आहे. आणि अशा प्रकारे ससा शर्यत हरला .
तात्पर्य -अतिआत्मविश्वासामुळे पराभव होऊ शकतो
0 टिप्पण्या