महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार.

 निकाल पाहण्यासाठी 

 येथे क्लिक करा  

https://mahresult.nic.in


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result) येत्या 27 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल. मंडळाने राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2024 मध्ये ही परीक्षा घेतली होती. दरम्यान, खाली दिलेल्या संकेतस्थळांवर इयत्ता दहावीचा निकाल पाहता येईल.



16 लाख विद्यार्थांनी परीक्षेसाठी केली नोंदणी

मंडळाने काही दिवसांपूर्वीच इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण मंडळातील निकाल सर्वाधिक लागला आहे. या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागले होते. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धाकधूक वाडली आहे. मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे. 


नऊ मंडळांमध्ये घेण्यात आली दहावीचा परीक्षा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व नऊ विभागांचा निकाल 27 मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे. 



या पाच संकेतस्थळांवर पाहा इयत्ता दहावीचा निकाल


1. https://mahresult.nic.in 


2. http://sscresult.mkcl.org


3. https://sscresult.mahahsscboard.in 


4. https://results.digilocker.gov.in 


5. https://results.targetpublications.org