मे 2025 रोजी लागणार बारावीचा निकाल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ.

5 मे 2025 रोजी निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

१) https://mahresult.nic.in/

२) http://www.sscresult.mkcl.org/

३) https://sscresult.mahahsscboard.in/

 बारावीचा निकाल कधी लागणार याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तारीखेची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असून बारावीचा निकाल कधी लागणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर हा निकाल 15 तारखेचा आत लागेल, असं सांगण्यात येत होतं. मात्र आता थेट निकालाची तारीखच समोर आली आहे.

बारावीचा निकाल कधी जाहीर होणार

उद्या सोमवारी 5 मेला बारावीचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. उद्या सकाळी बोर्डाकडून बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.

खालील संकेतस्थळावर दुपारी 01:00 वाजता बारावीचा निकाल पाहण्यात साठी उपलब्ध होईल.

mahresult.nic.in